अखेर तो दिवस आला आहे, ज्याची कतरिना कैफ आणि विकी कौशलचे चाहते जगभर आतुरतेने वाट पाहत होते. या सुपरस्टार जोडीने सात फेरे घेतले आहेत आणि एकमेकांची आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेतली आहे. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट येथे वर्षातील सर्वात मोठा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांसोबत मेहंदी आणि संगीत समारंभ पार पडला. हा सोहळा आणखी खास बनवण्यासाठी नेहा कक्कर, हार्डी संधू, रोहनप्रीत ते आरडीबी सारखे स्टार्स देखील या ठिकाणी आले आहेत.
बॉलिवूडची सुरस्टार जोडी विकी कौशल आणि कतरीना कैफ अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. अद्यापतरी या लग्नसोहळ्याचे फोटो समोर आले नाहीत. विकी आणि कतरीनाच्या प्रेमाचे रुपांतर लग्नात झाले आहे. त्याची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा आहे. अनेक भन्नाट पोस्ट सध्या विकी आणि कतरीनाच्या लग्नाच्य व्हायरल होत आहेत. तर दुसरीकडे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसून येत आहे.
लग्नाच्या आधीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणा बाहेरील फोटो समोर आले आहेत. विकी आणि कतरिनाने प्रायव्हसीची विशेष काळजी घेतली आहे. त्यासाठी त्याने पाहुण्यांना आपला फोन हॉटेलच्या खोलीत ठेवण्यास आणि फोटो शेअर न करण्यास सांगितले आहे. मात्र, आता लग्नाच्या ठिकाणाचे फोटो व्हायरल होत आहेत ज्यात सुरक्षा कर्मचारी बॅरिकेड्स लावून बाहेर उभे आहेत आणि गेटच्या बाहेर दोन रुग्णवाहिकाही उभ्या असलेल्या दिसत आहेत.