कंगनाच्या कारवर हल्ला,पंजाबमध्ये जमावाने घेरले
कंगना हिमाचलमधून पंजाबमध्ये येत असताना शेतकऱ्यांनी तिच्या कारवर हल्ला केल्याचा आरोप कंगनाने रणौतने नुकताच केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली होती.मोदींच्या त्या घोषणेनंतर कंगना रणौतने एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. कृषी कायद्याच्या निर्णयावर भडकलेली कंगना भारताला ‘जिहादी देश’ असे म्हणाली होती. त्यानंतर कंगना रणौतनं शेतकरी आंदोलनाला ‘खलिस्तानी आंदोलन’ म्हटलं होतं.
शिर्डीत दोन मृतदेह आढळल्याने खळबळ,गारठून मृत्यू झाल्याचा संशय
दोन व्यक्तींचे मृतदेह रस्त्याच्याकडेला आढळल्यामुळे मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.मागील २ दिवसांपासून शिर्डीमध्ये कोसळत असलेला पाऊस आणि जाणवत असलेल्या थंडीमुळे या दोन्ही व्यक्तींचा गारठून मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृतांपैकी एकाची ओळख पटली असून दुसऱ्याची ओळख पटविण्याचे काम पोलीस करत आहेत.
गृहमंत्री शहांच्या आदेशानंतर एनसीबी डिजींचं राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र
एनसीबीच्या महासंचालकांनी राज्याच्या पोलीस महासंचालकाचा एक पत्र पाठविण्यात आले आहे.एनसीबीकडे वर्ग करण्याचे गृहमंत्री अमित शहा यांचे आदेश असल्याची माहिती मिळत आहे. गृहमंत्री अमित शाह यांचे आदेशानंतर एनसीबीच्या डीजीपींकडून केसेस वर्ग करण्यासाठी राज्याच्या डीजीपींना पत्र पाठविण्यात आले आहे. एनसीबीच्या पत्रानंतर पुन्हा केंद्र विरुद्ध सामना होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
भविष्यातील डिजिटल विश्वाचं नेतृत्व भारताकडेच, मुकेश अंबानींना विश्वास
माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भविष्यात भारत हा जगाचं नेतृत्व करेल, असा विश्वास रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला आहे. एकविसाव्या शतकाची पहिली दोन शतकं ही जगभरातील कनेक्टिव्हीटी वाढण्यासाठी महत्त्वाची होती. भारतातही या दोन दशकांत कनेक्टिव्हिटी वाढण्याचा वेग हा अभूतपूर्व होता. आता यानंतरचा टप्पा माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचं नेतृत्व जागतिक पातळीवर कोण करणार हा असून भारतातील धोरणं, तंत्रज्ञान आणि ज्ञान या गोष्टींचा विचार करता, आपला देशच जगाचं नेतृत्व करताना दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. इंटरनॅशनल फायनान्शिअल सेव्हिसेस सेंटर आणि ब्लुमबर्ग एशिया इन्फिनिटी फोरमला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे.
नव्या वेतन कायद्यामुळे कामगारांचं वेतन आणि सुट्ट्यांच्या नियमांत होणार बदल
केंद्र सरकार लवकरच नवा वेतन कायदा लागू करण्याची शक्यता आहे. खरंतर गेल्या एक ते दोन वर्षापासून हा कायदा लागू करण्याबाबत चर्चा सुरू आहे. परंतु, सातत्यानं ही प्रक्रिया लांबणीवर पडत होती. हा कायदा 1 एप्रिलला लागू होणार होता. त्यानंतर तो ऑक्टोबरमध्ये लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु, राज्य सरकारच्या काही आक्षेपांमुळे त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. हे वर्ष संपायला आता जेमतेम 27 दिवसांचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे नवा वेतन कायदा आता पुढील वर्षी लागू होऊ शकतो. हा वेतन कायदा लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा काम करण्याचा कालावधी, वेतन आणि सुट्ट्यांच्या नियोजनात आमूलाग्र बदल होणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा अंतर्गत अटक करण्याचे आदेश जारी?
परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आज मुंबई सेंट्रल येथील कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीनंतर परबांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकार संपकरी कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचा विचार करत असल्याचं सूचक वक्तव्य केलं. त्यानंतर आता संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत अटक करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे मेस्मा अंतर्गत याआधी 1998 साली अशीच एक कारवाई करण्यात आली होती. आता तशाच कारवाईचा पुनरावृत्ती होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आरोग्य विभागाच्या पेपर फुटी प्रकरणी आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातूनच तरुणाला अटक
आरोग्य विभागात मोठा गाजावाजा करत परीक्षा घेण्यात आली होती. पण हॉल तिकीट आणि पेपर फुटीचा प्रकार समोर आला होता. राज्यभर गाजलेल्या आरोग्य विभागाच्या ड गटाच्या पेपर फुटी प्रकरणी अखेर पुणे येथील सायबर सेलच्या पथकाने अखेर एका तरुणाला जालन्यातून अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य विभागाच्या पेपर फुटी प्रकरणी पुण्यात सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी तपासाअंती 29 वर्षीय विजय प्रल्हाद मुराडे या तरुणाला अटक केली आहे. हा तरुण जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील नांदी येथील रहिवासी आहे.
SD Socail Media
9850 60 3590