जिल्हास्तरावर एक एप्रिल पासून निर्बंधाची शक्यता

कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता जिल्हास्तरावर निर्बंध लागू केले जाऊ शकतात असे सूचित करण्यात आलेले आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे एक एप्रिल पासून अमलात आणली जातील.

केंद्राने आपल्या नव्या निर्देशानुसार जिल्हा / उपजिल्हा व शहर / प्रभाग स्तरावर असे निर्बंध लादले जाऊ शकतात असे सूचित केले आहे. त्याचबरोबर राज्यव्यापी टाळेबंदी करता येणार नाही हे देखील स्पष्ट केले. या परिस्थितीत लॉकडाउन तसेच व्यक्ती आणि वस्तूंच्या आंतरराज्यीय आणि राज्यांतर्गत हालचालींवर कोणतीही बंदी असणार नाही, असेही यात म्हटले आहे. ही मार्गदर्शक सूचना ३० एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे. देशातील कोविड -१९ प्रकरणांच्या आकस्मिक वाढीबाबतचे हे नवीन नियम आहेत, असे या आदेशात म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रमुख यांच्यात नुकत्याच झालेल्या चर्चेतून बरेचसे नवीन आदेश घेण्यात आले आहेत. आरटी-पीसीआर चाचण्यांचे प्रमाण विहित ७० टक्क्यांपर्यंत वाढवण्याव्यतिरिक्त, राज्यांना मागील वर्षीप्रमाणे कंटेंट झोनचे सीमांकन करतानाच प्रकरणांचा मागोवा घेण्यावर तसेच उपचार करण्यावर लक्ष केंद्रित करावे.

लसीकरणासंदर्भात केंद्राने म्हटले आहे की वेगवेगळ्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लसीकरणाची गती असमान आहे आणि काही राज्यामधील संथ गती ही चिंताजनक बाब आहे. “सध्याच्या परिस्थितीत कोविड -१९ विरूद्ध लसीकरण संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी गरजेची आहे,” असे त्यात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.