कोरेगाव-भीमा विजयस्तंभाच्या परिसर सुशोभीकरणासाठी एक कोटीचा निधी मंजूर

कोरेगाव- भीमा ऐतिहासिक विजयस्तंभाच्या परिसराचा विकास व सुशोभीकरणासाठी पुणे महापालिकेने एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रसाने रासने व इतर सदस्यांनीमिळून हा महत्त्वपूर्ण ठराव मंजूर केला आहे. स्थायी समिती सदस्य नगरसेवक राहुल भंडारे याने विजयस्तंभाच्या विकासाठी निधीची मागणी केली होती.

महानगपालिकेने कोरेगाव भीमा ऐतिहासिक विजयस्तंभासाठी दिलेल्या 1 कोटीच्या निधीमुळे या परिसराचा विकास करण्यास मोठी मदत होणार आहे. कोरेगाव-भीमा याठिकाणी ऐतिहासिक विजयस्तंभ आहे. स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिलेली होती. त्यामुळे या रणस्तंभाला संपूर्ण देशासह जागतिक पातळीवर वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. गेल्या अनेक वर्षापासून देशाच्या विविध भागातून लाखो अनुयायी या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येतात. 2018 मध्ये घडलेल्या हिंसाचारामुळे ही कोरेगाव भीमा अधिक चर्चेत आले होते.

कोरेगाव- भीमाजवळ भीमा नदीकाठी 1 जानेवारी 1818 मध्ये इंग्रज, महार रेजिमेंट व पेशवे यांच्या सैन्यात लढाई झाली. यात महार बटालियनच्या 500 शूरवीर सैनिकांनी पेशव्यांच्या 30 हजार सैनिकांचा पाडाव करुन विजय मिळविला होता. या लढाईत महार रेजिमेंटच्या अनेक शुरवीरांना हौताम्य आले. या धारातीर्थी पडलेल्या शूरवीर सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून इंग्रजांनी 1822 मध्ये कोरेगाव भीमाजवळ भीमानदीकाठी ‘विजयस्तंभ’ उभारला. 1927 सालापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येत होते. तेव्हापासून महाराष्ट्रासह देशभरातून आंबेडकरी बांधव एक जानेवारीला मोठ्या संख्येने मानवंदना देण्यासाठी येथे येऊ लागली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.