जायकवाडी धरणावर स्थलांतरीत पक्षांचे आगमन पहिल्यांदाच दिसला ‘युरेशियन कर्ल्यू’

हिवाळ्यात उत्तरेकडील तसेच युरोपीय देशांमध्ये थंडी आणि बर्फवृष्टी सुरु झाल्याने तेथील तलाव, पाणथळ गोठू लागतात. त्या पक्ष्यांना खाद्य मिळत नसल्याने ते भारतासारख्या उष्ण कटिबंधीय देशांकडे स्थलांतरीत होता. त्यामुळे सध्या जायकवाडी धरणावर सध्या स्थलांतरीत पक्षांचे आगमन सुरु झाले असून यंदा 8 वर्षांच्या खंडानंतर पहिल्यांदाच ‘युरेशियन कर्ल्यू’ या पक्षाचे आगमन झाले आहे. पर्यावरणतज्ज्ञांच्या अहवालाप्रमाणे हा पक्षी धोकाप्रवण श्रेणीत मोडतो. जगभरात केवळ 7 हजार युरेशियन कर्ल्यू शिल्लक आहेत. त्यामुळे या पक्षाचे आगमन जायकवाडी जलाशयावर होणे हे निसर्ग व पक्षीप्रेमींसाठी सुखावह आहे.

सध्या युरोपीयन देशात थंडीची लाट सुरु असल्याने तेथील पाणथळी गोठतात. त्यामुळे या पक्ष्यांना पुरेशा प्रमाणात खाद्य मिळत नाही. मात्र भारतात उष्ण वातावरण असल्याने येथील पाणवठे गोठत नाहीत. जायकवाडी धरण परिसरातील पाणथळांमध्ये या पक्ष्यांना खाद्य मिळते. येथील पाणथळांमधील पाणी खोल खोल जात असल्याने पक्ष्यांना किडे, लहान मासे खाद्य म्हणून सहजपणे मिळतात. त्यामुळेच येथे नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान मोठ्या प्रमाणावर परदेशी पाहुण्यांचे आगमन होते.

औरंगाबादचे मानद वन्यजीव रक्षक डॉ. किशोर पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, युरेशियन कर्ल्यू हा स्कॉटलंड तसेच युपोपीय देशातील पक्षी असून तो 7 ते 8 हजार किलोमीटरचे अंतर पार करून भारतात येत असतो. मागील आठवड्यातच तो जायकवाडीत दाखल झाला असावा. लांब टोकदार चोच, 400 ते 800 ग्राम वजन अशी या पक्षाची वैशिष्ट्ये आहेत. या पक्ष्याचा रंग वाळूसारखा असल्याने तो लवकर लक्षात येत नाही. तर या पक्षाचे पाय हिरवट निळ्या रंगाचे असतात. हिवाळा संपल्यानंतर प्रजननासाठी तो परत युरोपात जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.