सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावर बंदी घालण्यास न्यायालयाचा नकार

माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या – नेशनहूड इन अवर टाइम्स’ या पुस्तकाचे प्रकाशन, विक्री किंवा प्रसारावर बंदी घालण्यासाठी दिल्ली न्यायालयाने नकार दिला. ‘पुस्तक लिहिण्याचा आणि प्रकाशित करण्याचा लेखकाला अधिकार आहे, न्यायालयाने म्हटले आहे. मात्र, याचिकाकर्ते पुस्तकाविरोधात प्रचार करू शकतात, एडिशनल सिविल जज प्रीती पारेवा म्हणाल्या.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खुर्शीद यांनी त्यांच्या पुस्तकात हिंदुत्वादाची तुलना ISIS आणि बोको हराम सारख्या दहशतवादी गटांच्या जिहादी इस्लामशी केल्याने वादाला सुरूवात झाली. खुर्शीद यांचे विधान सामाजिक अखंडतेला धक्का पोहोचवणारे आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे असल्याचा आरोप करत हिंदू सेनेने या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी शुक्रवारी केली. हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी ही याचीका दाखल केली होती.

समाज आणि देशाच्या व्यापक हितासाठी पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली होती. वकील अक्षय अग्रवाल आणि सुशांत प्रकाश यांनी दावा केला होता की उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी या पुस्तकाच्या प्रकाशन करण्यात आलं. याचा अल्पसंख्याकांच्या मतांचे ध्रुवीकरण करणे असा उद्देश आहे.

या पुस्तकाचा निषेध म्हणून नैनितालमधील सलमान खुर्दसीद यांच्या घरावरही दोन दिवसांपूर्वी हल्ला, जाळपोळ करण्यात आली. पुस्तकातील विधानांवर केवळ भाजपच टीका करत नाही तर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनीही जाहीरपणे टीका केली की हिंदुत्वाबाबत आमची राजकीय विचारधारा वेगळी असली, तरी हिंदुत्वाची दहशतवादी संघटनांशी तुलना करणे अतिशयोक्ती आहे.

या प्रकरणावर, काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी हिंदू धर्म आणि हिंदुत्व या “वेगळ्या गोष्टी” असल्याचे म्हटले. भाजप-आरएसएसच्या विचारसरणीवर टीका करत आरोप केला की त्यांनी भारतात द्वेष पसरवला आहे.

मात्र, या वादावर खुर्शीद म्हणाले की, मी हे पुस्तक मी अयोध्येबाबत न्यायालयाचा निर्णय चांगला होता हे लोकांना समजावण्यासाठी लिहलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.