डीएसके यांचे पूत्र दीपक कुलकर्णी यांचा जामीन न्यायालयाने फेटाळला

कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात अटक असलेल्या दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांचे पूत्र शिरीष कुलकर्णी यांचा जामीन जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जयंत राजे यांनी फेटाळला. या प्रकरणात 30 हजारहून अधिक गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाली आहे.

याबाबत आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल केले आहे. डीएसके यांच्यासह त्यांची पत्नी हेमंती, मुलगा शिरीष, बंधू मकरंद कुलकर्णी, पुतणी, जावई यांच्यासह इतरांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर गुंतवणूकदारांची फसवणूकीसह भारतीय दंड संहिताच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल आहे.

हेमंती मकरंद कुलकर्णी यांच्यासह काहींना या प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर डीएसके यांचा जामीन फेटाळण्यात आला होता. त्यांनतर शिरीष कुलकर्णी यांनी त्याचे वकील ऍड. आशिष पाटणकर आणि ऍड. प्रतीक राजोपाध्ये यांच्यामार्फत जुलै महिन्यात जामिनाचा अर्ज दाखल केला होता.

त्यास विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी विरोध करत जामीन फेटाळण्याची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने जामीन फेटाळला. डी एस के च्या केस कडे सर्वांचे लक्ष लागले असून गुंतवणूकदारांना पैसे कधी मिळणार याची चिंता लागली आहे कारण डीएसकेची मालमत्ता अजून विकली गेली नाही आणि ही मालमत्ता विकली गेली तरच गुंतवणूकदारांना पैसे मिळणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.