राज्यभरात गेल्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. नाशिक जिल्ह्यात अचानक मुसळधार पाऊस झाला. यावेळी दुगारवाडी धबधब्यावर फिरण्यासाठी आलेले 20 हून जास्त पर्यटक अडकले आहे. तर एका पर्यटक वाहून गेला आहे.
नाशिकमध्ये दमदार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे दुगारवाडी धबधब्यावर पर्यटकांची एकच गर्दी उसळली आहे. रविवारीची सुट्टी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक धबधब्यावर आले होते. पण अचानक वाढलेलेल्या पावसामुळे पर्यटकांची एकच कोंडी झाली. यामुळे २० हून अधिक पर्यटक अडकले होते. पाऊस वाढल्यामुळे कुणालाही धबधब्यावरून बाहेर पडणे मुश्किल झाले होते. यावेळी अडकलेल्या पर्यटाकांपैकी १ पर्यटक वाहून गेला. अविनाश गरड (वय ४०) हा इसम वाहून गेला असून त्याचा शोध सुरू आहे.
पर्यटक अडकल्याची माहिती मिळताच रात्री उशिरा पर्यंत पर्यटकांना रेस्क्यु करण्याची सुरू कारवाई होती. अचानक वाढलेल्या पावसाने पाण्याची पातळी वाढल्याने पर्यटक अडकले होते. रात्रभर बचाव मोहिम राबवून सर्व पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. भर पावसात तब्बल 10 तास रेस्क्यु ऑपरेशन सुरू होते. मात्र, एका पर्यटक वाहून गेल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या पर्यटकाचा शोध घेतला जात आहे.
शहरातही तुफान पाऊस
दरम्यान, शहरातही अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली. विशेष म्हणजे गोदा काठावर पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या वाहनांचं प्रचंड नुकसान झालं. अनेक वाहनं पाण्याखाली गेली. फक्त पार्किंगमधील वाहनंच नाहीत तर गोदा काठावरील दुकानांना देखील पुराच्या पाण्याने वेढा घातला. पुराच्या पाण्यात अनेक गाड्या अडकल्या होत्या. पाऊस थांबल्यानंतर स्थानिक यंत्रणांच्या मदतीने वाहने बाहेर काढण्यात आली.