महाराष्ट्राला मिळाला जागतिक पुरस्कार; पर्यावरण क्षेत्रातल्या कामगिरीसाठी कौतुक होणारं देशातलं एकमेव राज्य

वातावरण कृतीसाठी अंडर२ कोएलिशनकडून महाराष्ट्राला प्रादेशिक नेतृत्वाचा जागतिक पुरस्कार मिळाला आहे. स्कॉटलंडमधील अंडर२ कोएलिशनच्या तीन पुरस्कारांपैकी एक पुरस्कार मिळवणारं देशातील एकमेव राज्य महाराष्ट्र ठरलं आहे. वातावरण संरक्षणासाठी राज्यस्तरावर केलेल्या प्रयत्नांची घेतली दखल घेतली गेली. आदित्य ठाकरे यांनी स्कॉटलंडमध्ये हा पुरस्कार स्वीकारला. हा पुरस्कार स्वीकारणारे ते जगातले सर्वांत तरुण पर्यावरण मंत्री ठरले.

वातावरण कृतीसाठी कटिबद्ध अशा अनेक राज्ये आणि प्रदेशांचे सर्वात मोठे जाळे  असलेल्या ‘अंडर२ कोएलिशन’च्या नेतृत्व पुरस्कार सोहळ्यातील पहिला ‘प्रेरणादायी प्रादेशिक नेतृत्वा’चा पुरस्कार  महाराष्ट्राने पटकविला.  COP 26 समिटसोबतच ग्लासगोमध्ये हा सोहळा झाला.

वातावरण बदलामुळे भारतात होणारे परिणाम कमी करणे आणि त्यासाठी अनुकुलता निर्माण करणे यासाठी महाराष्ट्राने देशामध्ये सर्वप्रथम राज्यव्यापी असा कार्यक्रम राबवून वातावरण नेतृत्वाविषयीची कटिबद्धता दाखवली आहे. ‘अंडर२ कोएलिशन’मध्ये तीनपैकी एक पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. या पुरस्कार सोहळ्यामध्ये ब्रिटिश कोलंबियाला (कॅनडा) ‘क्रिएटिव्ह क्लायमेट सोल्युशन्स’, क्युबेकला (कॅनडा) ‘क्लायमेट पार्टनरशिप्स’चा पुरस्कार मिळाला आहे.

“कोणत्याही भौगोलिक, वांशिक, राष्ट्रीय किंवा लिंगभेद अशा सीमा न पाहता या जागतिक संकटासाठी आम्ही एकत्रितपणे प्रयत्न आणि अर्थपूर्ण कृती करणे ही तातडीची गरज आहे अशी आमची धारणा आहे. आम्ही मनापासून करत असलेल्या वातावरण कृतींची ‘अंडर२ कोएलिशन’ने दखल घेतली त्यासाठी आम्हाला आनंद झाला आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.