IRCTC ने रामायण यात्रेची योजना तयार केलीय. या यात्रेमुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे. त्याचबरोबर कोविड 19 निर्माण झालेली स्थिती सुधारण्यासही मदत होणार आहे. सरकारने त्यासाठी रामायण सर्किटवर काम सुरु केलं आहे. या सर्व स्थळांवर रेल्वेद्वारे यात्रा करता येऊ शकणार आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अॅन्ड टुरिझम कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार सात नोव्हेंबरपासून या यात्रेला राजधानी दिल्लीवरुन सुरुवात होणार आहे.
दक्षिण भारतातील धार्मिक पर्यटन लक्षात घेत आयसीटीसीने श्री रामायण यात्रा-मदुरैची सुरुवात केली आहे. ही ट्रेन मदुराईपासून सुरु होऊ हम्पी, नाशिक, चित्रकूट, अलाहाबाद, वाराणसी जाईल आणि तिथून परत येईल. ही ट्रेन 16 नोव्हेंबरला रवाना होणार आहे. यात सांगण्यात आलं आहे की श्री रामायण यात्रा एक्सप्रेस-श्री गंगानगर 25 नोव्हेंबरला रवाना होईल. ही यात्रा एकप्रकारे धार्मिक हॉलिडे पॅकेज आहे. यात IRCTC तुम्हाला प्रभू श्रीरामाशी संबंधित धार्मिक स्थळांची यात्रा घडवेल.
जर तुम्ही रामायण सर्किटशी संबंधीत जागांवर जाऊ इच्छित असाल आणि धार्मिक पर्यटन करु इच्छित असताल तर हे पॅकेज तुम्हाला खूप उपयुक्त ठरेल. यात तुम्ही आरामशीर आणि कमी बजेटमध्ये यात्रा करु शकाल. या प्रकारची एक रामायण रात्रा या वर्षी झाली आहे. त्यात अयोध्या, नंदीग्राम, श्रृंगवेरपुर, चित्रकूट आदी स्थळांना भेट देण्यात आली होती. 6 दिवस आणि 5 रात्रीच्या या यात्रेला प्रति व्यक्ती एकूण खर्च 6 हजार 930 रुपये आला होता.
या प्रकारे IRCTC रामायण यात्रेची एक ट्रेन श्री रामायण एक्सप्रेस चालवणार आहे. ही रेल्वे तामिळनाडूतील मदुराईवरुन 14 नोव्हेंबरला प्रस्थान करेल. हे रेल्वे रामायणातील उल्लेख असलेल्या प्रमुख स्थळांवरील जाईल. ही 800 सीट असलेली रेल्वे मदुराईवरुन सुटेल. एकूण 15 दिवसांची यात्रा पूर्ण करुन ती तामिळनाडूतील रामेश्वरला पोहोचेल. IRCTC ने सांगितलं की, ही रेल्वे प्रभू श्री रामाशी संबंथित सर्व प्रमुख स्थळांवरील जाईल. रेल्वे भारतातील रामायण सर्किटसह नेपाळ आणि श्रीलंकेलाही जाईल. मदुराईवरुन चालणाऱ्या रेल्वेचे तिकीट 15 हजार 830 रुपये असेल. तर दिल्लीवरुन सुरु होणाऱ्या रेल्वेचे तिकीट 15 हजार 120 रुपये असणार आहे.