नेमबाजी वर्ल्डकप स्पर्धेत दोन भारतीय खेळाडू करोना पॉझिटिव्ह

नेमबाजी वर्ल्डकप स्पर्धेत दोन भारतीय खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. दिल्लीच्या डॉ. कर्णीसिंग शूटिंग रेंजमध्ये सुरू आहे. नेमबाजपटूंच्या प्रशिक्षकाने यासंदर्भात माहिती दिली. करोनाची लागण झालेल्या या खेळाडूंची नावे मात्र जाहीर करण्यात आलेली नाहीत.

”भारताचे दोन आघाडीचे नेमबाजपटू या स्पर्धेत करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे दोघांना क्वारंटाइन करण्यात आले आहे अशी माहिती प्रशिक्षकाणे दिली. नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाने 57 नेमबाजांची मोठी तुकडी मैदानात उतरवली होती. 15 नेमबाजपटूंनी ऑलिम्पिक कोटा मिळवला आहे. संबंधित प्रशिक्षक म्हणाले, “हॉटेलमध्ये काही लोक सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत नाहीत. याव्यतिरिक्त, हॉटेलमध्ये काही खासगी कार्यक्रमही आयोजित केले जात आहेत. स्पर्धेतील तिन्ही विभागांमध्ये म्हणजे रायफल, पिस्तूल आणि शॉटगनमध्ये 40हून अधिक देशांचे 300हून अधिक नेमबाजपटू सहभागी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.