मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपासही एनआयएकडे

प्रसिद्ध उद्योजक अंबानी यांच्या घराजवळ आढळून आलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपासही केंद्रीय गृहमंत्रालयाने एनआयएकडे सोपवला आहे. या प्रकरणाचा तपास राज्य सरकारने एटीएसकडे दिला होता. मात्र, आता हे प्रकरणही एनआयएकडे देण्यात आलं असून, यासंदर्भातील आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने काढले आहेत.

हिरेन यांच्या मृत्यूवरून विरोधी पक्ष भाजपाने सरकारला धारेवर धरलं होतं. नंतर सरकारने मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवला होता. या प्रकरणात एटीएसकडून तपास सुरू झाला होता. या प्रकरणात पुढे काय होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतानाच केंद्राने मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासही एनआयएकडे दिला आहे. त्यामुळे अंबानी स्फोटकं आणि मनसुख हिरेन या दोन्ही प्रकरणाचा तपास आता एनआयए करणार आहे.

केंद्राने एनआयएकडे तपास सोपवला. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. अंबानी स्फोटकं प्रकरणातील महत्त्वाची व्यक्ती असलेल्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर परिसरात आढळून आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.