सध्या सर्वत्र इंधनाचे दर शंभरीला भिडलेला आहेत. अश्या परिस्थिती वाहन चालविताना इंधन कसे वाचवता येईल या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष द्यायला हवे. त्यासाठी या टिप्स देण्याचा हा प्रयत्न…
वाहन चालविताना काही बाबींची काळजी घेतली तर जास्तीत जास्त मायलेज मिळवून इंधनबचत करता येते. अनुभवी चालकांना याबाबत माहितीही असेल मात्र अनेक नवीन वाहनचालकाना जास्तीत जास्त मायलेज कसे मिळवतात याची माहिती नसते. यासाठी काही उपाय…
वाहन जास्तीत जास्त वेगाने चालविले की चांगले मायलेज मिळते व इंधन बचत होते, हा गैरसमज असतो. यामुळे मायलेज मिळत नाही. यासाठी वेगमर्यादेचे पालन करणे महत्त्वाचे असते. कंपनीने प्रत्येक गिअरवर त्या वाहनाची वेगमर्यादा ठरविलेली असते. ती वेगमर्यादा पाळणेही गरजेचे आहे.
चाकांत हवा कमी असेल तर त्याचा वाहनाच्या इंधन कार्यक्षमतेवर परिणाम होत असतो. नवीन वाहनांमध्ये चाकांमधील दाब तपासणारी यंत्रणा बसविण्यात येत आहे. चाकांमध्ये हवेचा दाब कमी-जास्त असेल तर ती चालकाला सूचना करतात. ज्या वाहनांमध्ये ही सुविधा नसेल त्यांनी हवेचा दाब तपासणे गरजेचे आहे. .
प्रत्येक वाहन उत्पादक कंपनीने वाहन किती किलोमीटर चालल्यानंतर त्याची तपासणी (सर्व्हिसिंग) करून घ्यावी हे सांगितलेले असते. मात्र आज, उद्या करीत आपण त्याकडे दुर्लक्ष करीत असतो. मात्र वेळेवर तपासणी ही महत्त्वाची असते. तसेच इंधन (ऑइल) बदल करणेही तितकेच महत्त्वाचे असते.
अनेकदा गरज नसतानाही आपण वाहन सुरू ठेवतो. वाहतूक कोंडी किंवा कोणची वाट पाहात असताना हे अनेकदा होते. मात्र नकळत होत असलेल्या या प्रकारामुळे वाहन इंधन पीत असते. याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
अलीकडील अत्याधुनिक वाहनांत क्रुझ कंट्रोल या सुविधेचा वाहनांत वापर केलेला असतो. वेगमर्यादा निश्चित करण्यासाठी व वाहनचालकाला लांबच्या प्रवासात क्लच, रेस करताना पायाचा त्रास होत असतो. यासाठी याचा उपयोग होत असतो. महामार्गावर वाहन चालविताना वाहन ६० च्या वेगात असेल तर कु्रझ कंट्रोल चालू केले तर त्याच वेगमर्यादेत वाहन चालत असते. या काळात आपल्या पायालाही आराम मिळत असतो व वाहन मर्यादित वेगात चालत असल्याने मायलेजही चांगले मिळते.