Micromax चा तिसरा स्मार्टफोन भारतात लाँच

मोबाईच्या जगात आता Micromax कंपनीने In सीरिजमधील तिसरा स्मार्टफोन भारतात लाँच केला. हा लेटेस्ट बजेट स्मार्टफोन आहे. कंपनीने हा फोन 6GB रॅम, ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि 5000mAh बॅटरीसह उतरवलाय. कंपनीने पहिल्या सेलमध्ये हा फोन १० हजारांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध करणार आहे.

फिचर काय आहेत –
‘Micromax In 1’ या फोनमध्ये कंपनीने 6.67 इंचाचा फुल एचडी+ होल-पंच डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये 2.0 गीगाहर्ट्झ ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो G80 प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी माली G52 GPU चा सपोर्ट मिळेल. फोनमधील स्टोरेज माइक्रोएसडी कार्डद्वारे 256 जीबीपर्यंत वाढवता येणंही शक्य आहे. फोटोग्राफीसाठी यामध्ये 48 मेगापिक्सेल प्रायमरी, 2 मेगापिक्सेल डेप्थ आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर असलेला ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. शिवाय सेल्फीसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 18W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे. पूर्ण चार्ज झाल्यावर ही बॅटरी 180 तासांपर्यंत म्यूझिक स्ट्रीमिंग, 24 तासांपर्यंत वेब ब्राउझिंग आणि 18 तासंपर्यंत व्हिडिओ स्ट्रीमिंग बॅकअप देते.

कंपनीची खास सवलत
फ्लिपकार्टच्या वेबासाइटवर आणि माइक्रोमॅक्सच्या अधिकृत वेबसाइटवरुन 26 मार्च रोजी दुपारी 12 वाजेपासून पहिल्यांदा हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होईल. पहिल्या सेलमध्ये ‘Micromax In 1’ खरेदी करणाऱ्यांसाठी कंपनीने खास सवलत जाहीर केली आहे. ‘Micromax In 1’ च्या 4 जीबी रॅम व 64 जीबी इनबिल्ट स्टोरेजची किंमत 10 हजार 499 रुपये आहे. पण पहिल्या सेलमध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी याची किंमत 9 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर, 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेजची किंमत 11 हजार 999 रुपये आहे. पण पहिल्या सेलमध्ये ग्राहकांना 11 हजार 499 रुपयांत हे मॉडेल खरेदी करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.