दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेमुळे आजी-माजी मुख्यमंत्री पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. अहंमपणा डोक्यात जाऊ द्यायचा नसतो असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे. त्याला विरोधी फडणवीस देवेंद्र फडणवीसांनीही उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर राणे आणि राज ठाकरेंना पक्षाबाहेर का जावं लागलं? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला आहे. तर उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री व्हायची इच्छा नव्हती मीच त्यांना आग्रह केला असं शरद पवारांनी म्हंटलं आहे.
उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची अजिबात तयारी नव्हती. त्यांचा हात मी हातात धरला आणि वर केला आणि सांगितलं हेच मुख्यमंत्री होतील. उद्धव ठाकरे यांनी मी अक्षरश: सक्तीनं हात वर करून मुख्यमंत्री होणार असं जाहीर केलं. देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे. मी अत्यंत जबाबदारिने सांगतो, हे सरकार बनवण्यात माझा किंचित हात होता
नेतृत्व करायला कुणी करायचे हे आमदारांना विचारले, मी सक्तीने उद्धव ठाकरे यांचा हात वर केला. फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना काही ही करून मुख्यमंत्री व्हायचे हा केलेला आरोप मला योग्य वाटत नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर सलग संकटे आली, त्यात ठाकरे यांनी अत्यंत जबाबदारीने परिस्थिती हाताळली, राजेश टोपे यांनी ही काम केलं, प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते.’
आपण डोकवल्यावर लक्षात येत जर मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर राज ठाकरे आणि राणेंना पक्षाबाहेर का जावं. लागलं. तुमची महत्त्वाकांक्षा पूर्ण केली. आम्हाला दोष देणं थांबवा, आता तेच तेच सांगून अजून किती वर्ष काढणार आहात असंही विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.