चित्रपट चांगला चालावा यासाठी विविध उपाय केलेलं जातात. तसाच काही उपाय बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचे काही चित्रपट हिट झाले तर काही फ्लॉप ठरले. बऱ्याच वेळा त्याचे चित्रपट फ्लॉप होत असल्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात आले. पण अभिषेकने याकडे दुर्लक्ष केले. पण आता अभिषेकने त्याच्या नावात बदल केला असल्याचे समोर आले आहे. त्याने हे पाऊल त्याचा आगामी चित्रपट हिट होण्यासाठी उचलले असल्याचे म्हटले जात आहे.
अभिषेकने त्याच्या संपूर्ण करिअरमध्ये असे पहिल्यांदा केले आहे. नुकताच त्याचा आगामी चित्रपट ‘द बिग बुल’चा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा ट्रेलर पाहता त्यामध्ये अभिषेकने त्याच्या नावात आणखी एक ‘A’ जोडला आहे. त्यामुळे Abhishek Bachchanच्या ऐवजी Abhishek A Bachchan असे दिसत आहे. अभिषेकने त्याच्या नावात वडिल अमिताभ बच्चन यांच्या नावाचे पहिले अक्षर ‘A’ लिहिण्यास सुरुवात केली असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या पूर्वी अभिषेक Abhishek Bachchan असे नाव लिहित होता.