जन्म – ६ जून १९८८
नेहा कक्करने आपल्या करियरची सुरुवात इंडियन आयडलमधून केली आहे. या कार्यक्रमात ती एक स्पर्धक म्हणून झळकली होती. दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबात नेहाचा जन्म झाला. नेहा प्रमाणेच तिची बहीण सोनू देखील गायक असून त्या दोघी सुरुवातीला देवीच्या जागरणामध्ये भजनं गायच्या. यासाठी तिला केवळ ५०० रुपये मिळायचे. पण आज तिने तिच्या मेहनतीने बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण केले असून आँख मारे, माही वे, मिले हो तुम, बदरी की दुल्हनियाँ, मैं तेरा बॉयफ्रेंड, काला चष्मा ही तिची अनेक गाणी प्रचंड गाजली आहेत. इंडियन आयडलची एक स्पर्धक ते परीक्षक हा तिचा प्रवास थक्क करणार आहे. ज्या कार्यक्रमाने आपल्याला एक ओळख मिळवून दिली, त्याच कार्यक्रमात इतकी महत्त्वाची भूमिका बजावायला नेहाला मिळाली. नेहा कक्करने आपल्या करिअरची सुरुवात इंडियन आयडल या रिऑलिटी शोद्वारे केली. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनमध्ये ती एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. त्यावेळी ती केवळ अकरावीत शिकत होती. या कार्यक्रमाचे तिला विजेतेपद मिळवता आले नसले तरी या कार्यक्रमामुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. नेहा कक्करने ऑक्टोबर २०२० मध्ये तिचा बॉयफ्रेंड रोहनप्रीत सिंगशी लग्न केले आहे. रोहन देखील गायक आहे.
संजीव वेलणकर, पुणे