२४ तासात देशात चार महिन्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या

करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने अनेक राज्यांनी पुन्हा एकदा नव्याने निर्बंध लावले आहेत. महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाउनचा पर्याय निवडण्यात आला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंध लावण्याचा इशारा दिला आहे. गेल्या २४ तासात देशात ४० हजार ९५३ नवे करोना रुग्ण सापडले असून गेल्या चार महिन्यातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. याशिवाय २३ हजार ६५३ जण उपचारानंतर बरे झाले असून १८८ मृत्यूंची नोंद झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, यासोबत आतापर्यंत एकूण करोनाबाधितांची संख्या १ कोटी १५ लाख ५५ हजार ३८४ इतकी झाली असून १ कोटी ११ लाख ७ हजार ३३२ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या देशात २ लाख ८८ हजार ३९४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मृतांची संख्या १ लाख ५९ हजार ५५८ इतकी आहे. देशभरात आतापर्यंत ४ कोटी २० लाख ६३ हजार ३९२ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

भारतात शुक्रवारी नोंद झालेल्या ३९ हजार ७२६ रुग्णांच्या तुलनेत वाढ झाली आहे. देशात गेल्या आठवड्यापासून दिवसाला २० हजाराहून जास्त करोना रुग्ण आढळत आहेत. आरोग्य मंत्रालयानुसार, देशाच्या एकूण आकडेवारीत महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि छत्तीसगड यांचा ८०.६३ टक्के वाटा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.