सनरायजर्स हैद्राबादकडून रॉयल चँलेजर्स बंगळुरु पराभुत

प्लेऑफमध्ये गेलेल्या रॉयल चँलेजर्स बंगळुरु (RCB) संघाला सनरायजर्स हैद्राबादकडून (SRH) थोडक्यात पराभव पत्करावा लागला. अवघ्या 4 धावांच्या फरकाने आरसीबी पराभूत झाली आहे. यंदाच्या पर्वातील हा 52 वा सामना अबुधाबीच्या शेख जायद मैदानावर पार पडला. आरसीबी याआधीच प्लेऑफमध्ये गेली असून हैद्राबादचं स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आलं होतं. त्यामुळे सामना प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा नसला तरी आरसीबीसाठी हा त्यांचा आयपीएलमधील 100 विजय असणार होता. पण अवघ्या 4 धावांच्या फरकाने त्यांना हा सामना गमवावा लागला.

सामन्यात नाणेफेक जिंकत आरसीबीने गोलंदाजी निवडली. हा निर्णय सुरुवातीला त्यांच्यासाठी बरोबर ठरला. कारण आरसीबीने हैद्राबाद संघाला 141 धावांवर रोखलं. ज्यामुळे मुंबईसमोर 142 धावांचेच लक्ष्य होते. पण हे लक्ष्य त्यांना निर्धारीत 20 षटकांत पूर्ण करता न आल्याने अखेर आरसीबीचा संघ पराभूत झाला. दरम्यान 100 वा विजय मिळवण्यापासून वंचित राहिल्याने आरसीबीचा कर्णधार विराट कमालीचा निराश झालेला पाहायला मिळाला.

आरसीबीने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडल्याने हैद्राबादचा संघ प्रथम फलंदाजीला मैदानात उतरला. पण संघाकडून अतिशय सुमार फलंदाजी करण्यात आली. केवळ कर्णधार केन विल्यमसन (31) आणि जेसन रॉयच्या (44) भागिदारीच्या जीवावर हैद्राबादने 141 धावांपर्यंत मजल मारली. या दोघांशिवाय होल्डर (16), प्रियम गर्ग (15) आणि शर्मासह (13) रिद्धीमान साहाने 10 धावा केल्या. तर आरसीबीकडून हर्षल पटेलने पुन्हा चमकदार कामगिरी करत 3 विकेट्स मिळवल्या. त्याच्याशिवाय डॅनियल क्रिस्टियनने 2 आणि चहल, गार्टन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

142 धावांचे आव्हान आरसीबीची तगडी फलंदाजी पाहता सोपे होते. पण संघाचे फलंदाज आज टिकून खेळू शकले नाहीत. सुरुवातीचे 3 विकेट्स गेल्यानंतर देवदत्त पडीक्कल आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण मॅक्सवेल 40 धावांवर बाद होताच पड्डीक्कलही 41 धावा करुन बाद झाला. ज्यानंतर अखेरच्या षटकात आरसीबीला 13 धावांची गरज होती. पण आरसीबीचा संघ केवळ 9 धावाच करु शकला. ज्यामुळे त्यांना 4 धावांनी पराभव पत्करावा लागला. हैद्राबादकडून सर्वच गोलंदाजानी उत्तम गोलंदाजी करत प्रत्येकाने एक-एक विकेट टिपली. तर आऱसीबीचा एक फलंदाज धावचीत झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.