दिल्लीनं मुंबई ४ गडी आणि ५ चेंडू राखत पराभूत केलं. मुंबईनं दिल्लीसमोर विजयासाठी १३० धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र दिल्लीनं १९ षटक आणि एका चेंडूत हे आव्हान पूर्ण केलं. या विजयासाह मुंबईचं प्लेऑफचं गणित बिघडलं आहे. मुंबईचा आता प्लेऑफमधला प्रवास आणखी खडतर झाला आहे. पुढचे दोन सामने जिंकून आता धावगतीवर निर्णय होणार आहे. जर दोन पैकी एक सामना गमवल्यास कोलकाता आणि पंजाबच्या निकालावर प्लेऑफ अवलंबून असणार आहे.
मुंबई विरुद्धच्या सामन्यात दिल्लीची अडखळत सुरुवात झाली. आघाडीचे फलंदाज पृथ्वी शॉ आणि शिखर धवन झटपट बाद झाले. दिल्लीला शिखर धवनच्या रुपाने पहिला धक्का बसला आहे. शिखर धवन ७ चेंडूत ८ धावा करून बाद झाला. यात एका षटकाराचा समावेश आहे. किरोन पोलार्डने स्टंपवर थेट चेंडू फेकत त्याला तंबूचा रस्ता दाखवला. पृथ्वी शॉ ७ चेंडूत ६ धावा करून तंबूत परतला आहे. कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. पंचांचा निर्णय नॉटआऊट होता. मात्र मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने रिव्यू घेतला. यात पृथ्वी शॉ बाद असल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे संघावर दडपण आलं. त्यामुळे आक्रमक खेळी करण्याच्या नादात स्टीव स्मिथ बाद झाला. नाथनच्या गोलंदाजीवर स्टीव स्मिथ त्रिफळाचीत झाला. ८ चेंडूत ९ धावा करून बाद झाला. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत २६ धावा करून तंबूत परतला आहे. तर ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर अक्षर पटेल पायचीत झाला आहे. त्याने ९ चेंडूत ९ धावा केल्या. या खेळीत एका षटकाराचा समावेश आहे. शिम्रॉन हेटमायर ८ चेंडूत १५ धावा करून बाद झाला. जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने त्याचा झेल घेतला. त्यानंतर श्रेयर अय्यर आणि आर. अश्विन यांनी विजयी भागीदारी केली.
मुंबईनं ८ गमवून १२९ धावा केल्या होत्या. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा साजेशी कामगिरी करू शकला नाही. १० चेंडूत ७ बाद झाला. यात एका चौकराचा समावेश होता. अवेश खानच्या गोलंदाजीवर रबाडाने त्याचा झेल घेतला. त्यानंतर डीकॉक आणि सुर्यकुमार यादव यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र संघाच्या ३७ धावा असताना डिकॉक १९ धावा करून बाद झाला. त्याच्या खेळीत १ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर अनरिचने त्याचा झेल घेतला. . सुर्यकुमार यादवच्या रुपाने मुंबईला तिसरा धक्का बसला. अक्षऱ पटेलने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्याने २६ चेंडूत ३३ धावा केल्या. या खेळीत २ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. सौरभ तिवारीही जास्त काळ मैदानात तग धरू शकला नाही. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतने त्याचा झेल घेत बाद केलं. त्याने १८ चेंडूत १५ धावा केल्या. किरोन पोलार्डही त्याच्या मागोमाग बाद झाला. त्यामुळे संघावर दडपण आलं. मात्र हार्दीक पांड्या आणि कृणाल पांड्या यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र फटका मारण्याच्या नादात हार्दीक अवेश खानच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने १८ चेंडूत १७ धावा केल्या. हार्दीक तंबूत जाऊन बसत नाही, तोवर नाथनही बाद झाला. तेव्हा संघांची अवस्था ७ बाद १११ होती. त्यानंतर जयंत यादवने आक्रमक खेळी करण्याचा प्रयत्न केला. त्याना ४ चेंडूत ११ धावा केल्या. यात १ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. मात्र अश्विनच्या गोलंदाजीवर स्टीव स्मिथने झेल घेत त्याला तंबूचा रस्ता दाखवला.