सायबेरियाच्या कोळशाच्या खाणीत झालेल्या भिषण स्फोटात कामगार आणि त्यांच्या बचावासाठी आलेल्या बचावकर्य टीममधल्या काही लोकांसह एकूण 52 जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 250 मीटर (820 फूट) जमिनीखाली हा स्फोटात झाला, रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले. मिथेन वायूच्या स्फोटानंतर काही वेळात आगीचा विषारी धुर खाणीत पसरला होता, ज्यामुळे बचावकार्य अत्यंत कठीण होते. बचावकर्त्यांना सुरूवातीला 14 मृतदेह सापडले, पण आगीतून मिथेन आणि कार्बन मोनोऑक्साइड वायू तयार झाल्यामुळे त्यांना इतर 38 कामगारांचा शोध थांबवावा लागला. टीमने मात्र, इतर 239 जणांना खाणीतून बाहेर काढले आणि त्यांची सुटका करण्यात आली. आपत्कालीन दलाच्या अधिका-यांनी नंतर मिडीयाला सांगितले की खाणीत आणखी कोणीही जिवंत सापडण्याची शक्यता नाही. ही घटना सायबेरियाच्या केमेरोवो प्रदेशातल्या लिस्टव्यझनाया खाणीत झाली आहे.
ज्या 52 जणांचा मृत्यू झाला आहे, तो आगीने नाही तर कार्बन मोनॉक्साईडच्या विषबाधेमुळे झाला आहे. स्फोटानंतर खाणीत विषारी धुर पसरला होता. 2010 नंतरचा हा रशियामधील हा सर्वात प्राणघातक खाण अपघात होता. दहा अकरा वर्षांपुर्वी केमेरोवो प्रदेशातील रास्पाडस्काया खाणीत दोन मिथेन स्फोटांच्या आगीत 91 लोकांचा मृत्यू झाला होता.
एकूण 285 लोक पहाटे Listvyazhnaya खाणीत होते. स्फोटानंतर काही वेळातच विषारी धुर वेंटिलेशन सिस्टमद्वारे पुर्ण खाणीत पसरला. बचावकर्त्यांनी 239 खाण कामगारांना बाहेक काढले, 49 जखमी होते आणि 11 मृतदेह त्यांना सापडले. मात्र, खाणीत एकदम आतल्या भागात अडकलेल्या इतरांचा शोध घेत असताना, सहा बचावकर्ते देखील नंतर मरण पावले.
सर्बियाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मृतांच्या कुटुंबियांना शोक व्यक्त केला आणि जखमींना आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आदेश सरकारला दिले.