इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या तेराव्या सामन्यात RCB चा संघ एका टप्प्यावर सामना गमावतोय असं दिसतं होतं. पण अनुभव दिनेश कार्तिकने शाहबाज अहमदच्या साथीने सामन्याचं चित्रच बदलून टाकलं. सामन्यात संजू सॅमसनच्या राजस्थान संघावर फाफ डू प्लेसिसच्या बँगलोर संघाने ‘रॉयल‘ विजय (RR vs RCB) मिळवला. इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत एक रंगतदार सामना पहायला मिळाला. रोलरकोस्टर सारखे अनेक चढ-उतार या सामन्यामध्ये होते. पण दिनेश कार्तिकने आणि अहमदने सामन्याचं चित्र पालटलं. टी 20 क्रिकेटमधली खरी रंगत या सामन्यामधून अनुभवता आली. टी 20 तुम्ही वेगवान सुरुवात करा किंवा धीमी. सामन्याचा नूर पालटण्यासाठी एक-दोन षटक पुरेशी असतात. तेच सामन्यात घडलं.
तत्पूर्वी आरसीबीचा कॅप्टन फाफ डू प्लेसीसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. राजस्थानच्या संघाला प्रथम फलंदाजीला निमंत्रित केलं हेतं. कालच्या RR vs RCB सामन्यानंतर पॉईंट्सच्या टेबलमध्ये बदल दिसून आला. विशेष म्हणजे राजस्थान पराभवानंतरही पहिल्या स्थानी कायम आहे. तर RCB सहाव्या क्रमांकावर गेला असून त्याला चार पॉईंट्स मिळाले आहेत.
रविचंद्रन अश्विन टाकत असलेल्या 14 व्या ओव्हरमध्ये दिनेश कार्तिकने फटकेबाजी केली. त्याने तीन चौकार आणि एक षटकार लगावत 21 धावा चोपल्या. तिथूनच सामन्याच चित्र बदललं. राजस्थानने निर्धारीत 20 षटकात 169 धावा फटकावल्या. हे लक्ष्य रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने चार विकेट आणि पाच चेंडू राखून पार केलं. RCB ने हा सामना जिंकला तो, दिनेश कार्तिक नाबाद (44) आणि शाहबाज अहमद (45) यांच्या फलंदाजीमुळे. त्यामुळे RCB पॉईंट्सच्या टेबलमध्ये टेबलमध्ये सहाव्या स्थानी आला आहे.
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या मंगळवारी झालेल्या तेराव्या सामन्यात राजस्थान संघावर फाफ डू प्लेसिसच्या बँगलोर संघाने ‘रॉयल‘ विजय मिळवला. असं असलं तरी राजस्थान पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी कायम आहे. तर बँगलोर संघाने सहाव्या स्थानी झेप घेतली आहे.