18 वर्षावरील लोकांना लस द्यायला सुरुवात झालीय.काही तरुणांमध्ये अशा काही सवयी असतात ज्यांची लसीकरणाच्या दरम्यान काळजी घेणं महत्वाचे आहे. निष्काळजीपणा केल्यावर हे धोकादायक असू शकते. लसीकरणाचे काही नियम आहे ज्यांना पाळणे खूप आवश्यक आहे. नाहीतर लस घेतल्यावर त्याचा उलट परिणाम होऊ शकतो. म्हणून या गोष्टींची काळजी घ्यावी.
1 मद्यपान करू नये – लसीकरणाच्या पूर्वी चुकून देखील मद्यपान करू नये. या मुळे लसीचा प्रभाव कमी होऊ शकतो. लसीकरणाच्या पूर्वी आपण खूप पाणी प्यावं आणि पोट भरून जेवण करावे.
2 वेदनाशामक औषधें घेऊ नये – लस घेण्यापूर्वी कोणत्याही प्रकारच्या वेदनशामक औषधे घेऊ नये.
जर आपल्याला वेदना कमी प्रमाणात आहे तर आपण काही घरगुती उपाय देखील करू शकता. काही औषध लसीच्या विपरीत परिणाम करू शकतात. म्हणून लसीकरणाच्या किमान 24 तासापूर्वी कोणतेही वेदनाशामक औषधे घेऊ नये. नंतर देखील औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावे.
3 प्रवास करणे टाळा – लस घेतल्यावर कोणत्याही प्रकारचा प्रवास करू नये. असं समजू नका की आता लसीकरण झाले आहे तर आपल्याला कोरोना होणार नाही. अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्ह्रन्शन च्या निर्देशानुसार लसीकरणानंतर कोणत्याही प्रकारचे प्रवास करू नये असा सल्ला देण्यात आला आहे.
4 धूम्रपान करू नये – आजची तरुणपिढी चहा सह धूम्रपान सर्रास करतात. परंतु या पासून लांब राहावे. लसीकरणानंतर धूम्रपान करू शकत नाही आणि मद्यपान देखील करू शकत नाही. या मुळे आपले फुफ्फुसे प्रभावित होतात म्हणून कोणत्याही प्रकारचा नशा करू नये.
5 रात्री उशिरा पर्यंत जागू नये – पुरेशी झोप हे आपल्याला निरोगी ठेवण्याचे काम करते. म्हणून लसीकरणाच्या पूर्वी आणि नंतर भरपूर विश्रांती घ्या. रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघू नका. चांगली झोप घेतल्याने लस प्रभावी राहते.
6 वर्दळीच्या ठिकाणी जाऊ नये – वर्दळीच्या ठिकाणी जाऊ नका. आपल्याला घरातच राहायचे आहे. लसीकरणाच्या दोन ते तीन दिवस बाहेर कुठेही जाऊ नका.
7 लगेच काम करू नका – बऱ्याच लोकांना लस घेतल्यावर काहीच त्रास जाणवत नाही म्हणून ते काम करायला लागतात. अशी चूक
करू नये. जर आपल्याला बरे वाटत आहे तरीही काम करू नका. शरीराला विश्रांती द्या. जेणे करून लस प्रभावी होईल.
लसीकरणाचे हे काही नियम आहे जे सर्वाना पालन करणे आवश्यक आहे. हे सर्व नियम लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बनविले आहे. जेणे करून त्यांना काही त्रास होऊ नये. या नियमांचे काटेकोर पालन केलेच पाहिजे.
टीप : हा लेख सुरक्षेच्या संदर्भात साधारण माहितीसाठी देत आहे काहीही करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. sdnewsonline या माहितीचा दावा करत नाही.
Very nice live news online, it gives recent reports and daily updates .Thank you SD News.