आसाराम बापू रूग्णालयात दाखल

आसाराम बापू यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. जोधपूरमधल्या ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एआयआयएम) येथे आयसीयू मध्ये एलिव्हेटेड लिव्हर एंजाइम आणि युरिन इन्फेक्शनच्या त्रासाठी त्यांना भरती करण्यात आलं. आसाराम बापूंना गेल्या पाच दिवसांपासून ताप येत होता. काही वैद्यकीय चाचण्या करून त्यांना 48 तास रुग्णालयात निरीक्षणासाठी ठेवले जाईल. इंडिया टूडे माध्यमाने ही बातमी दिली आहे.

आसाराम बापू सध्या बलात्कार प्रकरणात जन्मठेपेच्या शिक्षेसाठी जोधपूर सेंट्रल जेलमध्ये कैद आहेत. 2013 मध्ये 16 वर्षीय मुलीच्या बलात्कार प्रकरणात 2014 मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती.

शनिवारी, आसाराम बापूंना सकाळी 11 वाजता तुरुंगातून रूग्णालयात नेण्यात येत असताना त्यांच्या भक्त मोठ्या संख्येने जोधपूर एआयआयएम येथे गर्दी केली होती. स्थानिक प्रशासनाला लोकांना जबरदस्तीने बाहेर काढावे लागले.

या वर्षी मे महिन्यात आसाराम बापूंना कोविडची लागण झाल्याने एमडीएम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते, नंतर त्यांना उपचारासाठी एआयआयएम मध्ये दाखल करण्यात आले होते. ऑगस्टमध्ये सर्वोच्च न्यायालयाने आसाराम बापूंची त्यांची शिक्षा माफ करून उत्तराखंडमध्ये आयुर्वेदिक उपचार घेण्याची याचिका फेटाळली होती. त्यांचा गुन्हा “सर्व सामान्य गुन्हा” नसून त्यांचावर दया दाखवता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.