पंतप्रधान देशात राबविणार स्वच्छता मोहीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत मिशन-अर्बन 2.0’ आणि ‘अमृत 2.0’ या दोन नव्या उपक्रमांचा प्रारंभ केला. 2014 मध्ये देश हागणदरीमुक्त करण्याचा संकल्प आपण केला होता. त्यानंतर देशभरात तब्बल 10 कोटीपेक्षा अधिक शौचालयांची निर्मिती झाली. देशवासियांनी हा संकल्प पूर्णत्त्वाला दिला. आता ‘स्वच्छ भारत मिशन-अर्बन 2.0’ या उपक्रमाच्या माध्यमातून देशातील शहरे कचरामुक्त करण्यात येतील, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. या कार्यक्रमाला केंद्रीय शहर विकास मंत्री हरदीप सिंह पुरी आणि राज्यमंत्री उपस्थित होते.

‘स्वच्छ भारत मिशन-अर्बन 2.0’ आणि ‘अमृत 2.0’ या दोन नव्या उपक्रमांमुळे देशातील वाढत्या शहरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा सामना करणे शक्य होईल. यामुळे शहरे हे अधिक उत्तम होतील. आगामी काळात कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे प्रमाण 70 टक्क्यांवरून 100 टक्क्यापर्यंत नेण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे.

भाषणातील ठळक मुद्दे

  • स्वच्छ भारत अभियान आणि अमृत मिशनचा आतापर्यंतचा प्रवास खरोखरच प्रत्येक देशवासियांना अभिमानाने भरून टाकणारा आहे. यामधून आदर, प्रतिष्ठा, देशाची महत्वाकांक्षा आणि मातृभूमीवर प्रेम प्रतित होते, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा असमानता दूर करण्याचे एक उत्तम माध्यम म्हणून शहरी विकासावर विश्वास होता. चांगल्या आयुष्याच्या आकांक्षेत गावांमधून बरेच लोक शहरांमध्ये येतात. आम्हाला माहित आहे की त्यांना रोजगार मिळतो परंतु त्यांचे राहणीमान अगदी खेड्यांपेक्षाही खालच्या दर्जाचे राहते. त्यामुळे या लोकांची दुहेरी कुचंबणा होते. एकतर, घरापासून दूर, आणि वरून अशा परिस्थितीत राहणे. ही परिस्थिती बदलण्याचा, विषमता दूर करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी बरेच प्रयत्न केले. स्वच्छ भारत मिशन आणि मिशन अमृतचा पुढील टप्पा देखील बाबासाहेबांची स्वप्ने पूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
  • मला खूप आनंद आहे की आमच्या आजच्या पिढीने स्वच्छता मोहीम बळकट करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. चॉकलेटचा कागदही जमिनीवर फेकला जात नाही, तर खिशात ठेवले जातात. लहान मुले आपल्या पालकांना प्रसंगी अडवतात, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
  • आपल्याला हे लक्षात ठेवावे लागेल की स्वच्छता फक्त एक दिवस, एक पंधरवडा, एक वर्ष किंवा फक्त काही लोकांपुरते मर्यादित काम नाही. स्वच्छता ही प्रत्येकासाठी एक मोठी मोहीम आहे. स्वच्छता जीवनशैली आहे, स्वच्छता हा जीवनमंत्र आहे.
  • आज भारत दररोज सुमारे एक लाख टन कचऱ्यावर प्रक्रिया करत आहे. जेव्हा देशाने 2014 मध्ये मोहीम सुरू केली, तेव्हा देशात दररोज निर्माण होणाऱ्या 20 टक्के पेक्षा कमी कचऱ्यावर प्रक्रिया केली जात होती. आज आपण दररोज सुमारे 70 टक्के कचऱ्यावर प्रक्रिया करत आहोत. आता हे प्रमाण 100 टक्क्यांपर्यंत नेले पाहिजे.
  • शहरांच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही सातत्याने वाढत आहे. ऑगस्ट महिन्यातच देशाने राष्ट्रीय ऑटोमोबाईल स्क्रॅपिंग पॉलिसी सुरू केली आहे. हे नवीन स्क्रॅपिंग धोरण अर्थव्यवस्थेला अधिक बळकट करेल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.