आज दि.३० आॕक्टोबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी
पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे G-20 देशांच्या शिखर बैठकीसाठी इटली येथे पोहचलेले आहेत. मोदींनी आज पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. यावेळी व्हॅटिकनमध्ये पंतप्रधान मोदींसोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे देखील उपस्थित होते. पंतप्रधान मोदी आणि कॅथोलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांची ही पहिलीच समोरा-समोर झालेली भेट होती. पोप, रोमन कॅथोलिकचे प्रमुख असतात, म्हणजेच ते ख्रिचनांचे धर्मगुरू असतात.

देशातआत्महत्येचे
प्रमाण ८.७% नी वाढले

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या ताज्या आकडेवारीनुसार २०१९ च्या तुलनेत गेल्या वर्षी आत्महत्यांमध्ये १०% वाढ झाली आहे. २०२० मध्ये देशात एकूण १,५३,०५२ आत्महत्या झाल्या. आत्महत्येचे प्रमाण ८.७% ने वाढले. ३,०२५ आत्महत्यांसह दिल्लीचे ५३ शहरांमध्ये प्रथम स्थान आहे. त्यानंतर चेन्नईमध्ये २,४३०, बेंगळुरू (२,१९६) आणि मुंबई (१,२८२) आत्महत्या झाल्या. या चार शहरांमध्ये मिळून एकूण ५३ शहरांमधील एकूण प्रकरणांपैकी ३७.४% प्रकरणे आढळून आली. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये चेन्नईने किंचित घट दर्शविली तर दिल्लीत २४.८%, बेंगळुरू ५.५% आणि मुंबईने ४.३% वाढ नोंदवली.

विरोध करा पण सभासदांची जिरवू
नका : उदयनराजे भोसले

सातारा जिल्हा बँकेच्या पॅनेलमध्ये मला घेणारे ते कोण मी ठरवतो कुठे जायचे ते माझी जिरवण्यासाठी फील्डिंग लावणाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे मला विरोध करा पण सभासदांची जिरवू नका”, असे टोमणे मारत खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून सत्ताधारी पॅनलवर निशाणा साधला आहे.

बिहारमधील इंजिनिअरिंग कॉलेज आर्थिक
संकटात, बँकेनं लावलं टाळं

मोठ्या प्रमाणावर खर्चिक असणारं उच्च शिक्षण परवडत नाही, म्हणून गरीब समाजवर्गातील असंख्य विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिल्याचं आपण अनेकदा ऐकलं आहे. अशाच विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी, म्हणून अनोखी शक्कल लढवणारं बिहारमधील एक इंजिनिअरिंग कॉलेज आर्थिक संकटात सापडलं आहे. बँकेकडून घेतलेलं कर्ज न फेडल्यामुळे या कॉलेजवर कारवाई करण्यात आली. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात जाण्याची शक्यता आहे. बिहारच्या बक्सर जिल्ह्यात हा प्रकार घडला. अरिओन गावातील विद्यादान इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट अर्थात व्हीआयटीएम या संस्थेला बँकेनं टाळं लावलं आहे.

राज ठाकरे यांनी केली
करोनावर मात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी करोनावर मात केली आहे. तसेच, राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदाताई व त्यांची बहीण या देखील करोनामुक्त झाल्या आहेत. राज ठाकरे यांच्या चाचणीचा अहवाल आज निगेटिव्ह आला आहे. लीलावती रूग्णालयाचे डॉ. जलील पारकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

मच्छिमारांनी समुद्रात जाऊन कोस्टल
रोडचे काम बंद पाडले

शिवसेनेचा आणि मुंबई महानगर पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडच्या प्रकल्पाला वरळीतील स्थानिक मच्छीमारांनी जोरदार विरोध केला आहे. शनिवारी वरळी कोळीवाड्यातील स्थानिक मच्छिमारांनी कोस्टल रोडचे काम बंद पाडले आहे. मच्छिमारांची एकही मागणी मान्य न करत मनमानी पद्धतीने कोस्टल रोड प्राधिकरण काम करत असल्याचा आरोप स्थानिक मच्छिमारांनी केला आहे. यावेळी स्थानिकांनी भर समुद्रात जाऊन कोस्टल रोडचे सुरु असलेले काम बंद पाडले आहे. कोस्टल रोड प्राधिकरणाने परस्पर समुद्रात मासेमारी करण्याच्या ठिकाणी बार्जेस नांगरून ठेवल्यामुळे मच्छिमारांना मासेमारी करण्यात अडचण येत आहे.

2024 ला मोदीच पंतप्रधानपदाचे
उमेदवार : अमित शहा

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूका जवळ आली आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी सपा, बसपासारखे पक्षांकडून मतदारांना वेगवेगळे आश्वासनं दिली जात आहेत. भाजपच्या बड्या नेत्यांनी उत्तर प्रदेशचे दौरे करण्यास सुरुवात केलीय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील उत्तर प्रदेशच्या जनतेला आज (29 ऑक्टोबर) संबोधित केले. शहा यांनी 2024 मध्ये नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी 2022 मध्ये योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा एकदा बसवा, असे जनतेला आवाहन केले. त्यांचे हे वक्तव्य साधे सरळ आणि सोपे वाटत असले तरी त्यातून अनेक अर्थ काढले जात आहेत.

सुपरस्टार रजनीकांत
यांच्यावर शस्त्रक्रिया

सुपरस्टार रजनीकांत यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्यावर Carotid Artery revascularisation शस्त्रक्रिया पार पडली, जी मेंदूला रक्तपुरवठा पुनर्संचयित करण्याची प्रक्रिया आहे. “प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आणि त्यांची प्रकृती बरी होत आहे. त्यांना काही दिवसांनी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल, असे रुग्णालयाने सांगितले आहे.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.