इमारत कोसळतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथील आहे. सध्या शिमलामध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. या मुसळधार पावसामुळे भूस्खलनाची घटना घडली आहे. या गुरुवारी संध्याकाळी एक इमारत पत्त्यांसारखी कोसळली आहे. या इमारतीचा व्हिडिओ समोर आला आहे.
शिमल्यातील कच्ची खोऱ्यात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे इतर इमारतींना धोका निर्माण झाला आहे.सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. राज्य आपत्ती व्यवस्थापन संचालक सुदेश कुमार मोख्ता यांनी सांगितलं की, ही घटना शिमल्यातील हाली पॅलेसजवळ घोडा चौकी येथे संध्याकाळी 5.45 वाजता घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. या घटनेनंतर नगरविकास मंत्री सुरेश भारद्वाजही घटनास्थळी पोहोचले. त्याने नुकसानीचा आढावा घेतला आहे आणि सर्व शक्य मदत करणार असल्याचं सांगितलं.