गुगल आणि एप्पल ने केले आठ लाख ॲप बंद

गुगल प्ले स्टोरवरून आपण वेगवेगळे अॕप्स डाऊनलोड करत असतो. त्यामध्ये कोणतीही टर्म आणि कंडिशन्स न वाचता सगळ्या पॉलिसी स्वीकारून अॕप पुढे सुरू करतो. पण ते अॕप खरंच सुरक्षित आहे की नाही याचा कोणताही विचार करत नाही. आता गुगल आणि अॕपल कंपनीने मिळून प्ले स्टोरवरून 8 लाखहून अधिक अॕप्स डिलीट केले आहेत.

8 लाखहून अधिक अॕप्स हे फोनमधील डेटा लीक किंवा चोरी किंवा हानी पोहोचवण्याचे काम करत होते. त्यामुळे सुरक्षा धोक्यात येऊ शकत होती. या सगळ्याचा विचार करून गुगल आणि अॕपल कंपनीने प्ले स्टोरवरील 8 लाखहून अधिक अॕप्सवर बंदी घातली आहे. Pixalate च्या ‘H1 2021 डिलिस्टेड मोबाईल अॕप्स रिपोर्ट’मधून ही माहिती समोर आली आहे. 2021 च्या पहिल्या सहा महिन्यात 8,13,000 पेक्षा जास्त अॕप्स हटवण्यात आले जे लोकांच्या गोपनीयतेसाठी धोका निर्माण करणारे होते.

मिळालेल्या माहितीनुसार हटवण्यात आलेले हे अॕप्स9 अब्ज वेळा गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करण्यात आले होते. त्याच वेळी, कॅलिफोर्नियाच्या पिक्सलेटच्या मते, या अॕप्सला अॕपलच्या अॕप स्टोअरमधून काढण्यापूर्वी 2.1 कोटी युझर्सकडून रिव्ह्यू आणि रेटिंग देण्यात आले होते. अॅप स्टोअरमधून काढून टाकले गेले असले तरी, लाखो युझर्स अजूनही त्यांच्या स्मार्टफोनवर हे अॕप वापरत असतील. मात्र त्यांनी ही अॕप तातडीनं डिलीट करणं अत्यावश्यक आहे.

अहवालानुसार, गुगल प्ले स्टोअरवरील 86 टक्के मोबाईल अॕप्स आणि अॕपल अॕप स्टोअरवरील 89 टक्के मोबाईल अॕप्स 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना टार्गेट करत आहेत. हे देखील लक्षात घेतले आहे की 25 टक्के प्ले स्टोअर अॕप्स आणि 59 टक्के अॕप स्टोअर अॕप्समध्ये कोणतेही गोपनीयता धोरण नव्हते. अहवालात पुढे असे म्हटले आहे की, 26 टक्के अॕप्स रशियन गुगल प्ले स्टोअरवरून काढून टाकण्यात आले आणि 60 टक्के अॕप्स चीनी अॕप स्टोअरवर लिस्टेड करण्यात आले. चिनी अॅप स्टोअरवर कोणतेही गोपनीयता धोरण नव्हते.

कारवाईनंतर काढण्यात आलेले जवळजवळ 66 टक्के Google अॕप्सना किमान एक धोकादायक परवानगी होती. रनटाइम परमिशनमुऴे हे अॕप्स मोबाईलच्या सिस्टिमवर आणि इतर अॕप्सवर परिणाम करतात. हटवण्यात आलेल्या अॕप्सना कॅमेऱ्याची देखील परवानगी होती. धक्कादायक बाब म्हणजे त्यामध्ये GPS कोरनिडेट करण्यात येणार होता. त्यामुळे मोबाईलमधील गोपनीयता धोक्यात येणार होती.

गुगल किंवा अॕपल प्ले स्टोअर वरून कोणतंही अॅॕप डाऊनलोड करण्यापूर्वी त्याची माहिती पूर्ण वाचा. कोणत्याही थर्ड पार्टी अॕपला थेट प्रवेश मोबाईलमध्ये देणं म्हणजे आपल्या गोपनीय माहितीला अनोळखी व्यक्तीच्या स्वाधीन करण्यासारखं आहे. त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि सायबर क्राइम आपल्यासोबत होणार नाही याची काळजी घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.