शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याला नवं वळण आलंय. या हल्ल्यात वकील गुणरत्ने सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांचं नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शरद पवार हल्ल्या प्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात जयश्री पाटील यांचं नाव असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे.
जयश्री पाटील या गुणरत्ने सदावर्ते यांच्यासोबत प्रत्येक ठिकाणी असायच्या. मात्र जयश्री पाटील यांची या प्रकरणात नेमकी भूमिका काय आहे, याबाबता सखोल तपास आता पोलीस करत आहेत.
संदीप गोडबोलेला 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
या हल्ल्याप्रकरणी आरोपी असलेल्या संदीप गोडबोलेला 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. किला कोर्टात गोडबोलेचा जबाब सुनावण्यात आला. संदीप गोडबोले हा एसटीच्या तांत्रिक विभागातील कर्मचारी असून त्याला बडतर्फ करण्यात आलं आहे.
तसेच या हल्ल्याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील असलेले गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयाने पोलीस कोठडी 2 वेळा पोलीस कोठडी सुनावली. मात्र त्यानंतर सदावर्ते यांची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.