पंजाबचा किंग्जचा लाजीरवाणा पराभव

आयपीएलच्या पंधारव्या हंगामातील ३२ व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिट्लस या दोन संघांमध्ये लढत झाली. दिल्लीच्या दोन खेळाडूंना करोनाची लागण झालेली असतानाही त्यांनी पंजाबला ९ विकेट्स राखून सहज पराभूत केलं. आजच्या सामन्यात पंजाब संघ चांगली खेळी करेल अशी अपेक्षा होती. मात्र पंजाबचा डाव अवघ्या ११५ धावांवर गुंडाळला. प्रत्युत्तरादाखल दिल्ली कॅपिट्लसने अवघ्या ११ षटकांत सान्यावर आपलं नाव कोरलं.

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकल्यानंतर पंजाब किंग्जचे खेळाडू फलंदाजीसाठी मैदानात उतरले. मात्र पंजाबच्या एकाही फलंदाजाने चांगली कामगिरी केली. पंजाबाचे सर्वच खेळाडू ठराविक अंतरावर बाद होत गेले. वीस षटकात पंजाबने फक्त ११५ धावा केल्या. सलामीला आलेला शिखर धवन अवघ्या ९ धावा करुन झेलबाद झाला. त्यांतर पंजाबचे एकएक फलंदाज बाद होत केले.

दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या बेअरस्टोने ९ धावा केल्या. तर लिव्हिंगस्टोन अवघ्या दोन धावा करुन तंबुत परतला. शिखर धवनसोबत सलामीला आलेला मयंक अग्रवाल (२४) आणि चौथ्या विकेटसाठी आलेल्या जितेश शर्मा (३२) या दोघांनीच चांगली फलंदाजी केली. मधल्या फळीतील शहरुख खान संघाला सावरेल अशी अपेक्षा होती. मात्र त्यालादेखील फक्त १२ धावा करता आल्या. शेवटच्या फळीतील रबाडा (२), नाथन इलीस (०), राहुल चहर (१२), अर्षदीप सिंग (९) तर वैभव अरोरा याने दोन धावा केल्या. वीस षटके संपेपर्यंत पंजाबला फक्त ११५ धावा करता आल्या.

तर पंजाबने विजयासाठी दिलेल्या ११६ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी दिल्लीने सुरुवातीपासून आक्रमक खेळी केली. पूर्ण डावात दिल्लीचा पृथ्वी शॉ हा फक्त एक गडी झेलबाद झाला. त्याने २० चेंडूंमध्ये ७ चौकार आणि १ षटकार लगावत ४१ धावा केल्या. त्यानंतर डेविड वॉर्नर आणि सरफराज खान या जोडीने नाबाद खेळी केली. डेविड वॉर्नरने अर्धशतक झळकावत ३० चेंडूंमध्ये १० चौकार आणि १ षटकार लगावत ६० धावा केल्या. तर सरफराज खानने १२ धावा करुन संघाला विजयापर्यंत नेलं. दिल्लीच्या विजयाचा शिलेदार एकटा डेविड वॉर्नर ठरला. दिल्लीने पंजाबवर ९ गडी रखत दणदणीत विजय मिळवला.

दिल्लीचे सर्वच फलंदाज पंजाबला रोखण्यात यशस्वी ठरले. ललित यादवने नेहमीप्रमाणे धडाकेबाज खेळी करत दोन गडी बाद केले. तर अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनीदेखील दोन फलंदाजांना बाद करुन पंजाब संघ खिळखिळा केला. खलील अहमदनेही बेअरस्टो आणि शाहरुख खान या आघाडीच्या फलंदाजांना तंबुत पाठवलं. तर मुस्तफिजूरने एक गडी बाद करत दिल्लीच्या विजयासाठी हातभार लावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.