भारताच्या इतिहासातील सर्वात बेस्ट कर्णधारासह सर्वोत्तम यष्टीरक्षक म्हणूनही एमएस धोनी याला ओळखलं जातं. धोनी भारतीय संघात आल्यापासून कायम तोच यष्टीरक्षक म्हणून राहिला. त्याच्यामुळे अनेक यष्टीरक्षकांना संघात स्थान मिळालं नाही. यातीलच एक म्हणजे दिनेश कार्तिक. पण आज झालेल्या आय़पीएलच्या केकेआर विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात कार्तिकने आय़पीएलमध्ये यष्टीरक्षणाच्या बाबतीत धोनीला एका गोष्टीत मागे टाकलं आहे.
कार्तिकने आजच्या सामन्यात प्रसिद्ध कृष्णाच्या चेंडूवर सूर्यकुमार यादव (5) याचा झेल पकडत आय़पीएलच्या इतिहासात सर्वाधिक झेल पकडणारा यष्टीरक्षक म्हणून सन्मान मिळवला आहे. त्याने 205 सामन्यात हा 115 वा झेल पकडला. ज्यामुळे त्याने धोनीला मागे टाकले आहे. धोनीने 212 सामन्यात 114 झेल पकडले आहेत.
कार्तिक आणि धोनी नंतर सर्वाधिक झेल यष्टीरक्षक म्हणून पकडण्यात रॉबिन उथप्पा याचा नंबर लागतो. उथप्पाने 189 सामन्यात यष्टीरक्षक असताना 90 झेल पकडले आहेत.
उथप्पानंतर नंबर लागतो. माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेल याचा. पार्थिवने आयपीएलच्या 139 सामन्यात यष्टीरक्षक म्हणून 81 झेल पकडले आहेत.
पार्थिवनंतर पाचवा नंबर लागतो सनरायजर्स हैद्राबादचा यष्टीरक्षक रिद्धिमान साहा याचा. साहाने 127 आयपीएल सामन्यात यष्टीरक्षण करताना 79 झेल पकडले आहेत.