फ्लिपकार्ट एक्स्ट्राद्वारे देणार 4,000 पार्ट-टाइम जॉब

वॉलमार्टच्या मालकीची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने (Flipkart) बुधवारी सांगितले की, ते एक स्वतंत्र मार्केटप्लेस मॉडेल ‘फ्लिपकार्ट एक्सट्रा’ (Flipkart Xtra) सादर करत आहेत. जेणेकरून इनडिव्हिज्युअल, सेवा संस्था आणि तंत्रज्ञांना कमाईच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. ‘फ्लिपकार्ट एक्स्ट्रा’ अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. याद्वारे फ्लिपकार्ट इच्छुक व्यक्तींना एक सोपा अनुभव प्रदान करेल.

बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशननंतर इनडिव्हिज्युअल विविध भूमिकांसाठी स्वतःला ऑनबोर्ड करण्यास सक्षम असतील, असे एका निवेदनात म्हटले आहे. जे येत्या काही महिन्यांत डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हसह सुरू होईल आणि नंतर सर्विस पार्टनर किंवा टेक्नीशियनन्सचा समावेश असेल. त्यात म्हटले आहे की नवीन प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टची पुरवठा साखळी मजबूत करण्यास मदत करेल. यासह, पार्ट टाइम जॉब्स निर्माण केले जाऊ शकतात.

सणासुदीचा हंगाम आणि कंपनीच्या बिग बिलियन डेजच्या अगोदर लाँच केल्याने देशभरातील हजारो व्यक्ती, तंत्रज्ञ आणि सेवा एजन्सींना डिलिव्हरी पार्टनर म्हणून अतिरिक्त काम आणि कमाईच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल, असे कंपनीने निवेदनात म्हटले आहे. डिसेंबर 2021 पर्यंत फ्लिपकार्ट एक्स्ट्राद्वारे 4,000 पार्ट-टाइम असोसिएट जोडण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.

7 ऑक्टोबरपासून Flipkart बिग बिलियन डेज सेल
सध्या सणांचा हंगाम सुरू झाला आहे. दरम्यान, फ्लिपकार्टने त्यांच्या बिग बिलियन डेज सेलची तारीख जाहीर केली आहे. हा सेल 7 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि 12 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील.

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल लवकरच सुरू होणार आहे. फ्लिपकार्टने अद्याप त्याच्या तारखा जाहीर केल्या नाहीत, मात्र लवकरच कंपनी या सेलच्या तारखा जाहीर करून स्मार्टफोन डील्सबद्दल खुलासा करू शकते. फ्लिपकार्टच्या वार्षिक सेलमध्ये तुम्हाला नवीन फोनवर सवलत मिळेल. यात अनेक लोकप्रिय फोन समाविष्ट करण्यात आले आहेत. सूचीमध्ये तुम्हाला Pixel 4a, Poco X3 Pro, Moto Edge 20 Fusion, Asus Rog Phone 3 आणि Infinix Hot 10s वर सूट मिळू शकते. याशिवाय, तुम्ही क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 1000 रुपयांची सूट देखील मिळवू शकता.

यूपीएससी संबंधी अधिक माहिती वाचा : pscgoalupscgoal.com
या ठिकाणी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.