स्मार्टफोनला लागू शकते आग, या 10 चुका करु नका

गेल्या काही महिन्यांत स्मार्टफोनचा स्फोट झाल्याच्या अनेक गंभीर घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे स्मार्टफोनचा योग्य वापर करणं गरजेचं आहे.

स्मार्टफोनला आग लागण्यासाठी कारणीभूत असलेल्या 10 चुकांची माहिती आम्ही इथे देत आहोत. त्या चुका आपल्याकडून होणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. स्मार्टफोनला आग लागल्यामुळे अमेरिकेत अलीकडेच एक विमान रिकामं करावं लागलं होतं. स्मार्टफोनला आग लागण्याची शक्यता फार कमी असते; मात्र आपण फोनचा वापर कसा करतो यावर ही गोष्ट अवलंबून असते.

स्मार्टफोनमध्ये 4500mAh किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेची बॅटरी असते. तसंच अलीकडे स्मार्टफोनच्या फास्ट चार्जिंगची सोही उपलब्ध असते. त्यामुळे स्मार्टफोन योग्य पद्धतीने वापरणं गरजेचं आहे. फोनला आग लागण्याच्या अनेक घटनांसाठी मोबाइल कंपन्यांनी युझर्सच्या चुकांनाच जबाबदार धरलं आहे.

त्यातल्या 10 चुकांची माहिती इथे देत आहोत. 

डॅमेज असतानाही फोनचा वापर करणं – तुमचा स्मार्टफोन पडल्यामुळे फुटला असेल, तर तसाच वापरू नये. लगेच सर्व्हिस सेंटरला नेऊन फोन दुरुस्त करून घ्यावा. डिस्प्ले फुटला असेल किंवा बॉडी फ्रेम तुटली असेल, तर त्यातून पाणी, घाम आत जाऊन फोनची बॅटरी किंवा इतर पार्ट बिघडू शकतो.

अशा फोनचा वापर करणं धोकादायक ठरू शकतं. – डुप्लिकेट चार्जरचा वापर – फास्ट चार्जिंग अॕडाप्टरचा वापर करताना खूप काळजी घ्यावी. आपल्या फोनसोबत आलेला चार्जरच वापरावा. जास्त पॉवरच्या चार्जरचा वापर केल्यास तुमच्या फोनच्या बॅटरीवर ताण येऊ शकतो.

डुप्लिकेट चार्जरचा वापर टाळावा. – थर्ड पार्टी किंवा डुप्लिकेट बॅटरीचा वापर – थर्ड पार्टी किंवा डुप्लिकेट बॅटरीचा वापर केल्यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. खराब लिथियम-आयन बॅटरी तुमच्या फोनला जास्त गरम करू शकते. त्यामुळे फोनला आग लागण्याची शक्यता वाढते.

– गरम झाल्यास फोन वापरू नये – फोन खूप जास्त गरम झाला आहे, असं वाटलं तर तो बाजूला ठेवून त्याच्यापासून दूर जावं. फोनचं चार्जिंगही बंद करावं. – फोन चार्ज करण्यासाठी कार चार्जिंग अॕडाप्टरचा वापर नको – प्रवासात कार चार्जरऐवजी पॉवर बँकचा वापर करावा. भारतात कार उत्पादक कंपन्या थर्ड पार्टी व्हेंडरकडून अॕक्सेसरीज इंस्टॉल करून घेतात.

बऱ्याचदा त्यात वायरिंगच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष केलेलं असतं. त्यामुळे या चार्जरमध्ये चार्ज करताना पॉवर अचानक वाढू शकते. त्यामुळे, तुमच्या फोनला आग लागू शकते. – फोन ओव्हरचार्ज करणं – फोन रात्रभर चार्जिंगला लावू नये.

तसंच कायम 100 टक्के चार्जिंग करणं आवश्यक नाही. फोनची बॅटरी ९० टक्के चार्ज झाल्यानंतर चार्जिंग बंद करणं ही चांगली सवय आहे. यामुळे बॅटरीचं आयुष्य वाढतं. जास्त चार्ज केल्यामुळे बॅटरी फुगते आणि फुटू शकते.

– फोनवर अनावश्यक भार टाकणं टाळावं – चार्जिंगला लावलेला असताना फोनवर काहीही ठेवू नये. एरव्हीही त्यावर कोणतीही वस्तू ठेवू नये. – पॉवर स्ट्रिप किंवा एक्स्टेंशन कॉर्ड वापरून फोन चार्ज करणं टाळावं. – पॉवर स्ट्रिप किंवा एक्स्टेंशन कॉर्ड वापरल्याने शॉर्ट-सर्किटचा धोका वाढतो.

त्यामुळे तसं करणं टाळावं. – स्थानिक दुकानदारांकडून फोन दुरुस्त करवून न घेणं – स्मार्टफोनच्या अधिकृत सर्व्हिस सेंटरवरच तो दुरुस्तीसाठी द्यावा. स्थानिक दुकानदारांकडे फोन दुरुस्त करण्यासाठी योग्य ती उपकरणं नसतात. त्यामुळे फोनच्या सर्किटमध्ये बिघाड होऊ शकतो.

– चार्जिंग करताना सूर्यप्रकाश नको – फोन चार्जिंगला लावलेला असताना त्यावर सूर्यप्रकाश येत नाही ना हे पाहावं. तसंच, अन्य कोणत्याही माध्यमातून त्याचा उष्णतेशी संपर्क येऊ नये. तसं झाल्यास फोन आणखी जास्त गरम होतो. त्यामुळे त्याला आग लागू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.