मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानभवनात विश्वासदर्शक ठराव जिंकला. मात्र सभागृहाबाहेरील शिंदे गट आणि शिवसेनेचा संघर्ष अद्याप सुरु आहे. शिवसेना कुणाची हा प्रश्न अजून कायम आहे. याबाबतची कायदेशीर लढाईल सुरुच आहे. शिवसेना संपणार नाही. आम्ही त्यांचावर करवाई करू. लोकांच्या मनात त्यांच्याविषयी काही नाही. राज्यात मध्यावधी निवडणुका होतील असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.
आदित्य ठाकरे यांनी पुढे म्हटलं की, शिवसेनेची कोर्टात लढाई सुरु आहे, आमचा व्हीपच खरा व्हीप आहे, हे कोर्टात आम्ही सिद्ध करु असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. जे पळाले त्यांना शिवसेना संपवायची होती. मात्र शिवसेना कधीही संपणार नाही. सध्या सर्व आमदार एका बबलमध्ये राहतायेत. कधी गोवा, कधी सूरत तर कधी गुवाहाटी येथे ते राहतायेत. मात्र त्यांना कधीतरी त्यांच्या मतदारसंघात जावं लागेल. तेव्हा मतदारांचं म्हणणं काय आहे त्यावेळी काही स्पष्टता येईल, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.