MS धोनीचं टीम इंडियात कमबॅक

धोनीने टीम इंडियाला अनेक सामने जिंकवून देताना आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफीज भारताला मिळवून दिल्यात. धोनीमुळे भारतवासियांना अनेक सोनेरी क्षण अनुभवायला मिळाले, त्याचं साक्षीदार होता आलं. अगोदर कसोटी क्रिकेटमधून निवृत्त घेतलेल्या धोनीने भारताच्या 74 व्या स्वातंत्रदिनी क्रिकेटच्या सगळ्या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली… ‘तो कधीतरी पुन्हा येईल’ अशी अपेक्षा अनेकांना होती… अखेर तो पुन्हा आलाय… भारतीय संघात त्याचं कमबॅक झालंय… पण तो संघात आलाय नव्या भूमिकेत….. टी ट्वेन्टी वर्ल्डकपसाठी बीसीसीआयने काल रात्री भारतीय संघाची घोषणा केली. यामध्ये 15 सदस्यीय संघाबरोबर आणखी एक मोठी घोषणा होती, ती घोषणा आहे MS धोनी भारतीय टी ट्वेन्टी संघाचा मेन्टॉर असेल.

धोनीने आतापर्यंत आपल्या व्यूव्हरचनेने अनेक वेळा प्रतिस्पर्ध्यांना पाणी पाजलं. शक्य नसतानाही अनेक विजय शक्य करुन दाखवले… कधी आक्रमक धुव्वाधार खेळी करुन तर कधी स्टम्प्सच्या मागे राहून गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात अनाकलनीय बदल करुन…. आता टी ट्वेन्टी क्रिकेट संघात धोनी खुद्द मैदानावर नसेल पण मैदानाबाहेर राहून तो विराटसेनेला प्रतिस्पर्ध्याना चितपट करण्याचे धडे देणार आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनी धोनीची टी ट्वेन्टी वर्ल्डकपसाठी भारतीय संघाच्या मेन्टॉरपदी निवड केलीय.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये होणाऱ्या टी ट्वेन्टी वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा करतावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं, एम एस धोनी भारतीय संघाचा मेन्टॉर असेल… मी त्याच्यााशी दुबईत चर्चा केलीय… केवळ टी ट्वेन्टी स्पर्धत मेंटॉर बनण्यास तो तयार असल्याचं त्याने मला सांगितलं. कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्याशीही मी चर्चा केलीय. त्यांचीही याला संमती आहे.

धोनीचं टीम इंडियात कमबॅक झाल्याने संघाची गणितं बदलणार आहेत. धोनी संयमी आणि शांत आहे तर याच्याअगदी उलट, विराट खूपच आक्रमक आहे.. धोनीच्या शांतपणाचा बहुतेकवेळा भारताला फायदा झालाय. दुसरीकडे विराटच्या आक्रपणामुळे संघाला कधी फायदा तर कधी तोटा होता… आता धोनीच्या संघातल्या नव्या भूमिकेने काही गणितं बदलणार हे निश्चित…! कारण आक्रमक संघाला संयमाची जोड धोनीमुळे मिळणार आहे.

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), के एल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्सार पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.