आज दि.४ सप्टेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

हिम्मत असेल तर जावेद अख्तर यांनी
तालिबान वर टीका करावी

आरएसएस आणि विश्व हिंदू परिषद सुद्धा तालिबानी मानसिकतेचे असल्याचे वक्तव्य जावेद अख्तर यांनी केले असून हे वक्तव्य सर्रास चुकीचे असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी दिली आहे. जावेद अख्तर यांचं विधान म्हणजे केवळ बेशरमपणाचा कळस नसून समस्त हिंदू समाजाचा अपमान आहे. जावेद अख्तर हे विसरत आहेत की, या हिंदू समाज बहुसंख्य असलेल्या देशात राहून ते तालिबानवर टीका करत आहेत. हिंमत असेल तर अफगाणिस्तानमध्ये जा आणि तालिबानवर टीका करा. त्यामुळे जावेद अख्तर आपलं विधान मागे घ्या. हिंदू समाजाची क्षमा मागा नाहीतर तुमच्या विरोधामध्ये बदनामीचा खटला केला जाईल,” असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.

मध्ये भारताला चौथं गोल्ड, प्रमोद भगतने इतिहास घडवला

भारताचा शटलर प्रमोद भगत याने टोकयो पॅरालिम्पिकमध्ये इतिहास घडवला आहे. बॅडमिंटन सिंगल्स एसएल-3 स्पर्धेत प्रमोद भगतला गोल्ड मेडल मिळालं आहे. भारताचं टोकयो पॅरालिम्पिक स्पर्धेतलं हे चौथं गोल्ड मेडल आहे. बॅडमिंटन सिंगल्समध्ये पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात भारताने पहिल्यांदाच गोल्ड मेडल जिंकलं.

याच इव्हेंटमध्ये भारताच्याच मनोज सरकारने ब्रॉन्झ मेडल पटकावलं. यासह भारताची टोकयो पॅरालिम्पिकमधल्या मेडलची संख्या 17 झाली आहे. आतापर्यंतच्या पॅरालिम्पिकमधली भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. जगातला नंबर-1 पॅरा शटलर प्रमोद भगतने फायनलमध्ये ब्रिटनच्या डॅनियल बेथेलला 21-14, 21-17 अशा सरळ सेटमध्ये पराभूत केलं. हा सामना प्रमोदने फक्त 36 मिनिटांमध्येच जिंकला. तर मनोज सरकारने ब्रॉन्झ मेडलच्या मॅचमध्ये जपानच्या दायसुके फुजिहाराचा 22-20, 21-13 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला.

ममता बॅनर्जी भवानीपूरमधील
पोटनिवडणूक लढविणार

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल पक्षाला विधानसभेच्या २१३ जागांवर विजय मिळाला आहे. मात्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना त्यांची जागा राखण्यात अपयश आलं होतं. नंदीग्राममध्ये त्यांचा निसटता पराभव झाला होता. भाजपाच्या शुभेंदु अधिकारी यांनी ममता बॅनर्जींचा १,९५६ मतांनी पराभव केला होता. असं असलं तरी ५ मे २०२१ रोजी त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अशा परिस्थितीत त्यांना सहा महिन्यात विधानसभेवर निवडून जाणे आवश्यक होते. यासाठी त्यांनी भवानीपूर विधानसभा जागेची निवड केल्याचं बोललं जात होतं. तृणमूल काँग्रेसचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी राजीनामा दिला आहे. भवानीपूरमध्ये ३० सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे.

सुरक्षित शहरांच्या यादीमध्ये
दिल्ली आणि मुंबईचा समावेश

जगातील सर्वात सुरक्षित शहरांची यादी समोर आली असून या यादीत भारतातील दोन शहरांचा समावेश आहे. तर, डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. भारताची राजधानी दिल्लीसह मुंबईचे या यादीत नाव आहे. यामध्ये दिल्ली ६० पैकी ४८व्या क्रमांकावर तर मुंबई ५०व्या क्रमांकावर आहे. दिल्ली आणि मुंबईच्या मध्ये जोहान्सबर्ग आणि रियाध ही दोन शहरं आहेत. मुंबई दिल्लीपेक्षा जास्त सुरक्षित असल्याचं म्हटलं जातं तरीही वैयक्तिक सुरक्षेच्या बाबतीत दिल्ली ५२.८ पॉइंट्ससह ४१व्या क्रमांकावर आहे. मुंबई ४८.२ पॉइंट्ससह ५०व्या क्रमांकावर आहे.

आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न
केला तर त्यांना फोडून काढू

केंद्राच्या तीन शेती कायद्यांना विरोध करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने रविवारी मुझफ्फरनगरमध्ये महापंचायतीचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतील, असा विश्वास भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी व्यक्त केलाय. “महापंचायतीसाठी किती लोक येतील, हे सांगणं शक्य नाही. मोठ्या संख्येनं लोक पोहोचतील. शेतकऱ्यांना महापंचायतीपर्यंत पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना फोडून काढू आणि महापंचायतीत पोहोचू,” असे राकेश टिकैत यांनी म्हटलंय.

पाकिस्तान मध्ये दाताने
रिबीन कापून केले उद्घाटन

एखाद्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी लोकांनी राजकीय नेत्यांना आमंत्रित करणे हे काही नवीन नाही. उद्घाटन म्हंटल की, कात्रीने बांधलेली रिबीन कापायची एवढ साध सरळ काम. पण एका पाकिस्तानातील मंत्र्याने अलीकडेच एका दुकानाच्या उद्घाटन समारंभाला गेले असता हटके स्टाईलने रिबीन कापली. त्यांनी चक्क दाताने रिबीन कापली.आता, या घटनेच्या व्हिडीओने इंटरनेटवर वादळ उठवले आहे, अनेक नेटीझन्स या घटनेमुळे त्यांची थट्टा करत आहेत.

शाळादेखील सुरू झाल्या आहेत,
तर मग कोर्ट का बंद आहे

एका अल्पवयीन मुलीने भारताचे सरन्यायाधीश एन व्ही रामना यांना पत्र लिहून प्रश्न विचारलाय. देशातील सर्व व्यवहार पुर्ववत सुरू झाले आहेत, शाळादेखील सुरू झाल्या आहेत, तर मग कोर्ट का बंद आहे, असा सवाल या मुलीनं सरन्यायाधीशांना विचारला होता. दरम्यान, तिच्या या पत्राला जनहित याचिका मानून त्यावर सुनावणी घेतली जाईल, असं सरन्यायाधिशांनी म्हटलंय.

भाजपामध्ये महिलांचा सन्मान
होत नसल्याचा गंभीर आरोप

भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. भाजपामध्ये महिलांचा सन्मान होत नसल्याचा गंभीर आरोप मंदा म्हात्रे यांनी केला आहे. महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यापुढेच मंदा म्हात्रे यांनी ही खंत बोलून दाखवली आहे. दोनदा विधानसभेवर निवडून आल्यानंतरही पक्षाकडून डावललं जात असल्याचा आरोप यावेळी मंदा म्हात्रे यांनी केला आहे. २०१९ च्या निवडणुकीत आपण अपक्ष लढण्याचे संकेत पक्षाला दिले होते, असं देखील यावेळी मंदा म्हात्रे म्हणाल्या.

सात तासांमध्ये तब्बल १०१
महिलांवर सर्जरी केली

फक्त सात तासांमध्ये तब्बल १०१ महिलांवर सर्जरी करण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर झालेल्या गदारोळानंतर अखेर सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. छत्तीसगडमध्ये एका सरकारी नसबंदी शिबिरात हा प्रकार घडला आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सुरगुजा जिल्ह्यात एका सर्जनने सात तासात १०१ महिलांवर सर्जरी केली.

राज्यात कोरोनाचे सर्वाधिक
सक्रिय रुग्ण पुण्यात

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतरही पुणे जिल्ह्यातील परिस्थिती ही सातत्याने चिंताजनक राहिली आहे. अशातच आता पुण्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कारण, पुण्यातील 91 गावे सध्या कोरोना हॉटस्पॉट झाली आहेत. जुन्नर, आंबेगाव, दौंड या तीन तालुक्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक हॉटस्पॉटस आहेत. तर खेड, मावळ, भोर आणि वेल्हे या चार तालुक्यांमध्ये एकही गाव कोरोना हॉटस्पॉट नाही.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.