टोकयो पॅरालिम्पिकमध्ये भारतानं आणखी एक गोल्ड मेडल पटकावलं आहे. यंदा शूटिंगमध्ये भारतानं गोल्डची कमाई केलीय. 19 वर्षांचा शूटर मनिष नरवाल यानं 50 मिटर पिस्तूल इव्हेंटमध्ये गोल्ड मेडल कमाई केली. या प्रकारातील सिल्व्हर मेडलही भारताने पटकावले. सिंहराजनं हे मेडल पटकावलं.
मनिष आणि सिंहराज यांच्यात गोल्ड मेडलसाठी जोरदार लढत झाली.यामध्ये अखेर मनिषनं बाजी मारली. या स्पर्धेतील भारताचे हे तिसरे गोल्ड मेडल आहे.
पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी भारतानं टोकयोमध्ये नोंदवली आहे. या स्पर्धेत भारतीय टीमनं आत्तापर्यंत 3 गोल्ड, 7 सिल्व्हर आणि 5 ब्रॉन्झ असे एकूण 15 मेडल पटकावले आहेत. यापूर्वी रिओमध्ये झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतानं 2 गोल्ड आणि 4 सिल्व्हर मेडलची कमाई केली होती.