10 वीच्या परीक्षेत प्रावीण्य मिळविणाऱ्या मुलींना 5 हजार रुपयांचे रोख बक्षीस

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यीनींना प्रोत्साहन देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने मोठा निर्णय घेतलाय. यानुसार 10 वीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या मुलींना प्रत्येकी 5 हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. बक्षीसाची रक्कम थेट विद्यार्थीनींच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहेत. यासाठी पुणे जिल्हा परिषदेने अर्थसंकल्पात 25 लाख रुपयांच्या निधीची तरतूद केलीय.

पुणे जिल्हा परिषदेने याआधी इयत्ता बारावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थीनींनाही अशीच प्रोत्साहन रक्कम देऊ केली होती. आता बारावीनंतर दहावीच्या मुलींनाही हे बक्षीस दिले जाणार आहे. या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या मुलींच्या बँक खात्यावर त्यांच्या बक्षीसाची रक्कम जमा केली जाणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात 25 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलीय. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रेय मुंडे यांनी याबाबत माहिती दिलीय.

बोर्डानं जारी केलेल्या परिपत्रकानुसार माध्यमिक शालान्त परीक्षा म्हणजेच दहावीची परीक्षा बुधवारी 22 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीमध्ये होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज केला आहे त्यांनी यासंदर्भात त्यांच्या शाळेशी संपर्क साधून आवश्यक माहिती घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावीच्या सर्वसाधारण अभ्यासक्रमांची परीक्षा 16 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर या कालावधीत पार पडेल. या शिवाय बारावीच्या व्यवसाय अब्यासक्रमांची परीक्षा 16 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या दरम्यान घेण्यात येईल, अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.

इयत्ता दहावीची प्रात्याक्षिक आणि तोंडी, श्रेणी परीक्षा 21 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीमध्ये घेतली जाईल. दुसरीकडे बारावीची प्रात्याक्षिक, श्रेणी आणि तोंडी परीक्षा 15 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या दरम्यान घेतली जाईल.

दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचं वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. वेबसाईटवर उपलब्ध असलेलं वेळापत्रक हे केवळ माहितीसाठी असून महाविद्यालय आणि शाळांकडे देण्यात येणार वेळापत्रक अंतिम असेल, अशी माहिती देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.