शीना बोरा प्रकरणाचा धक्कादायक खुलासा, परमबीर सिंग यांचे कनेक्शन आले समोर
शीना बोरा हत्या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. काही दिवसांपूर्वीच इंद्रायणी मुखर्जी हिची जामिनीवर सुटका झाली आहे. तर या प्रकरणात आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचं नाव समोर आलं आहे. शीना हरवल्याची माहिती IPS अधिकारी परमबीर सिंग यांना दिली गेली होती, असा खुलासा तिचा बॅायफ्रेंड राहुल मुखर्जीने केला आहे. धक्कादायक म्हणजे, परमबीर सिंग यांना माहिती असून सुद्धा त्यांनी मदत न केल्याचे समोर आले आहे.
‘कोर्टाने उद्धव ठाकरेंच्या गालावर बारावी थप्पड मारली’, किरीट सोमय्यांचा घणाघात
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि सध्याचे विद्यमान अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे जेलमध्ये आहेत. या दोन्ही नेत्यांनी कोर्टात राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची परवानगी मिळावी यासाठी अर्ज दाखल केला होता. पण कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा फटका बसल्याचं मानलं जात आहे. विशेष म्हणजे कोर्टाच्या या निर्णयाचं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी स्वागत केलं आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करत सडकून टीका केली आहे.
“हे तर होणारच होतं. न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या गालावर बारावी थप्पट मारली आहे. माफिया सरकारच्या माफिया सरदारांना असं वाटतंय की, गुंडांसारखं राज्य करायचं. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेला हे मान्य नाही.
पोलिसांच्या चौकशीनंतर काँग्रेस नेत्याचा मृत्यू, नागपूरमध्ये खळबळ
नागपूरमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कुख्यात गँगस्टार आणि ड्रग्ज तस्कर आबू खान प्रकरणी चौकशीसाठी बोलावलेल्या काँग्रेस नेत्याचा मृत्यू झाला आहे. लतीफ शेख असं या काँग्रेस पदाधिकाऱ्याचं नाव आहे. लतीफ शेख यांनी आबू खानला तो फरार असताना एक लाख रुपयांची मदत केली होती, असा संशय पोलिसांना होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावलं होतं. पण पोलिसांच्या चौकशीनंतर घरी आल्यानंतर रात्रीच्या वेळी लतीफ शेख यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. या हृदय विकाराच्या झटक्यामुळे त्यांचं निधन झालं.
पंकजा मुंडेंना डावललं, नगरमध्ये कट्टर समर्थकाने केला आत्महत्येचा प्रयत्न
विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस वाढली आहे. पंकजा मुंडे यांच्या समर्थक ठिकठिकाणी निदर्शनं करत आहे. तर अहमदनगरमध्ये पंकजा मुंडे यांच्या एक समर्थकाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
पंकजा मुंडे यांना विधान परिषदेला उमेदवारी नाकारल्यानंतर मुंडे समर्थक संतापले आहे. अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यातील पंकजा मुंडे यांचे समर्थक मुकुंद गर्जे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
नवनीत राणांनी स्वीकारलं मुख्यमंत्र्यांचं चॅलेंज
हनुमान चालीसा म्हणायची असेल तर काश्मिरमध्ये जाऊन म्हणा असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना फटाकरून काढलं होतं. पण, आता नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांचं चॅलेंज स्वीकारलं आहे.
औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वाभिमान सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजप आणि नाहक वाद घालणाऱ्या राणा दाम्पत्यांना फटकारून काढलं होतं. आज नवनीत राणा मुख्यमंत्र्यांच्या सभेवर आपली प्रतिक्रिया दिली.
RBI च्या रेपो दरवाढीचा परिणाम; ‘या’ बँकांनी व्याजदर वाढवले
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने रेपो रेट 0.50 टक्क्यांनी वाढवल्याच्या एका दिवसानंतर, अनेक बँकांनी एक्सटर्नल बेंचमार्क लिंक्ड होम लोनचे व्याजदर वाढवले आहेत. म्हणजे घर घेण्यासाठी या बँकांकडून कर्ज घेणे महाग झाले आहे. RBI ने गेल्या 36 दिवसात दुसऱ्यांदा रेपो दरात वाढ केली आहे. यानंतर ICICI, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेने आपल्या कर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे.
रिषभ पंत झाला टीम इंडियाचा कॅप्टन
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-20 सीरिज सुरू व्हायच्या एक दिवस आधी टीम इंडियाला डबल धक्का बसला. कर्णधार केएल राहुल आणि डावखुरा स्पिनर कुलदीप यादव दुखापतीमुळे संपूर्ण सीरिज खेळू शकणार नाहीत, त्यामुळे ऋषभ पंतला टीमचं कर्णधार करण्यात आल आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजला आजपासून सुरूवात होत आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे.
राज्यसभेला संधी का मिळाली नाही? सोमय्यांचं भन्नाट उत्तर, थेट 50 हजार कोटींच्या घोटाळ्याचा दावा
राज्यात सध्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी उद्या निवडणूक पार पडणार आहे. तर विधान परिषदेच्या दहा जागांसाठी 20 जूनला निवडणूक होणार आहे. या दोन्ही निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. या निवडणुकीत भाजप नेते किरीट सोमय्या यांना संधी देण्यात आलेली नाही. किरीट सोमय्या यांच्यासह भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. पंकजा यांचं विधान परिषदेसाठी नाव चर्चेत होतं. पण त्यांना उमेदवारी मिळालेली नाही. दरम्यान, सोमय्या यांना आज राज्यसभेसाठी संधी न मिळाल्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी दोन वाक्यांमध्ये भन्नाट उत्तर दिलं. विशेष म्हणजे त्यांच्या या उत्तरामध्येही महाविकास आघाडीवर टीका होती.
“माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. राज्यातील 50 हजार कोटींचे घोटाळे बाहेर काढण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. राज्यातील साडेबारा कोटी जनतेचे रक्षण करण्याचं काम पूर्ण केल्याशिवाय बाकी काही नाही”, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली.
SD Social Media
9850 60 3590