शरद पवारांच्या भेटीसाठी गृहमंत्री दिल्लीत

रिलायन्स उद्योग समूहाचे मुकेश अंबानी यांच्या निवासस्थाना जवळ स्फोटकांनी भरलेलं वाहन सापडल्या प्रकरणी घडामोडी वेगाने घडत आहेत. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी केल्यानंतर आणखी कारवाईची शक्यता आहे. याचदरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीसाठी दिल्लीत पोहोचले होते. जवळपास दीड तास दोघांमध्ये चर्चा सुरु होती. बैठकीनंतर अनिल देशमुखांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांना गृहमंत्रीपदाबाबत विचारण्यात आले मात्र त्यांनी उत्तर देणे टाळले.

“शरद पवारांनी अनिल देशमुख यांच्याकडून मुंबईत सध्याच्या घडामोडीची माहिती घेतली. एनआयए आणि एटीएस या घटनेचा तपास करत असून राज्य सरकार पूर्ण सहकार्य करत आहे. योग्य दिशेने तपास सुरु असून जो कोणी दोषी असेल, त्यांच्यावर राज्य शासनाच्या मार्फत कारवाई केली जाईल. पण जोपर्यंत एनआयएचा संपूर्ण रिपोर्ट येत नाही, चौकशी पूर्ण येत नाही तोपर्यंत सांगता येणार नाही. रिपोर्ट आल्यानंतर त्यातून ज्या काही गोष्टी समोर येतील त्यानुसार कारवाई केली जाईल,” असं अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितलं.

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके असलेली गाडी आढळल्याच्या प्रकरणातील तपासात काही गंभीर चुका पोलिसांकडून झाल्याने आणि या प्रकरणाची चौकशी निष्पक्ष व्हावी यासाठी परमबीर सिंह यांची पोलीस आयुक्तपदावरून बदली केल्याचं,” गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांना याआधी सांगितलं. तर दुसरीकडे शिवसेना मात्र मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांना बदलले म्हणजे ते गुन्हेगार ठरतात असं नाही सांगत त्यांची पाठराखण करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.