तारक मेहता का उल्टा चष्मा फेम अभिनेत्री मुनमुन दत्तानं नुकतंच एक नवीन घर विकत घेतलं आहे. ज्याचे फोटो तिने इंटरनेटवर शेअर केले आहेत. मुनमुन दत्ता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमध्ये बबिता जीची भूमिका साकारत आहे. जी टीआरपीच्या यादीत टॉप 10 मध्ये आहे. नुकतंच तिने हे शाही घर विकत घेतलं आहे. ज्याचे फोटो पाहून जेठालालला देखील जेलस होईल.
अभिनेत्रीने तिच्या घरातील आतले फोटो काढले आहेत ज्यामध्ये तिच्या घरा फोटोंसाठी पोज दिली असून ती अतिशय आधुनिक शैलीत फोटोशूट करताना दिसत आहे. मुनमुन दत्ताने दिवाळीचा सण स्वतःच्या घरात साजरा केला. मुनमुन दत्ताने घरात सोफ्यावर बसून वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत. कमेंट सेक्शनमध्ये चाहते अभिनेत्रीच्या लूकचं आणि तिच्या स्टाइलचं कौतुक करत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शोच्या ट्रॅकमध्ये मोठा बदल झाला आहे. अनेक कलाकारांनी शो सोडला असून अभिनेता घनश्याम नाईक यांच्या निधनाने निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे. ते या कार्यक्रमातील सगळ्यात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक होते. या शोमध्ये घनश्याम नाईक नट्टू काकांची भूमिका साकारत होते. नट्टू काकांच्या भूमिकेसाठी नवीन अभिनेत्याचा शोध घेतला जात आहे.