टोकयो पॅरालिम्पिक्समध्ये भारताला दुसरं मेडल मिळालं आहे. उंच उडी स्पर्धेमध्ये भारताच्या निशाद कुमार याला सिल्व्हर मेडल मिळालं आहे. निशाद कुमारने 2.06 मीटर लांब उडी मारत, फायनलमध्ये दुसरा क्रमांक पटकावला. याच इव्हेंटमध्ये भारताचा रामपाल पाचव्या क्रमांकावर राहिला. टोकयो पॅरालिम्पिक्समधलं भारताचं हे दुसरं मेडल आहे.
याआधी भारताची टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेल हिनं देशाला पहिलं मेडल मिळवून दिलं.
पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणारा निशाद कुमार तिसरा भारतीय आहे. याआधी भाविनाबेन पटेलला सिल्व्हर मेडल मिळालं. तर 2016 साली दीपा मलिकनं ही कामगिरी केली होती. तिनं गोळाफेक स्पर्धेत 4.61 मीटर थ्रो करत सिल्व्हर मेडल पटकावले होते.