OnePlus 9 वर अनेक ऑफर्स आणि सवलती

Apple आणि Samsung प्रमाणंच मोबाईल कंपन्यांच्या शर्यतीध्ये OnePlus ही अग्रस्थानी बाजी मारताना दिसतो. मागील काही वर्षांमध्ये मोबाईल फोनच्या मार्केटमध्ये OnePlus कमालीची प्रगती करताना दिसत आहे. फोनची बॅटरी, कॅमेरा आणि जबरदस्त प्रोसेसर ही त्याच्या लोकप्रितेची काही खास कारणं. आता किंमतीबाबत सांगावं तर, सध्या हा फोन कमीत कमी दरात खरेदी करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. जवळपास 21 हजार रुपयांनी स्वस्त दरात हा फोन खरेदी करता येऊ शकतो.

OnePlus 9 च्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 49999 रुपये इतकी आहे. या फोनचा समावेश अॅमेझॉनच्या ऑफर लिस्टमध्ये करण्यात आला आहे. ज्यामुळं त्याची खरेदी तुम्हाला सवलतीच्या दरात करता येणार आहे. तुम्ही जर HDFC च्या क्रेडिट कार्डने हा फोन खरेदी करणार असाल तर यावर तुम्हाला 3 हजार रुपयांची सवलत मिळेल.

याशिवाय आणखी एका ऑफरमध्ये तुम्ही जुना फोन एक्सचेंज केल्यास त्यावर 18150 रुपयांची सवलत मिळू शकेल. जुन्या फोनची अवस्था चांगली असल्यास तुम्हाला चांगली डील मिळेल. ज्यामुळे तुम्ही OnePlus 9 ची जवळपास 21 हजार रुपयांनी स्वस्त दरात खरेदी करु शकता.

OnePlus 9 मध्ये तुम्हाला 6.55 इंचांचा HD+ AMOLED डिस्प्ले मिळतो. या फोनमध्ये 120Hz चा रिफ्रेश रेट मिळतो. डिस्प्ले प्रोटेक्ट करण्यासाठी यामध्ये गोरिल्ला ग्लासही देण्यात आली आहे. या फोनमध्ये तुम्हाला Snapdragon 888 chipset ही देण्यात येतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.