ते वाक्य कोर्टाचा निकाल येईपर्यंत
बोलणार नाही : नारायण राणे
भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर २४ ऑगस्टला त्यांना अटक करण्यात आली होती. २४ ऑगस्टला तारखेला उशिरा रात्री त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत उत्तरं दिली. “मी असं काय बोललो होतो की राग आला. ते वाक्य काय मी परत बोलणार नाही. कोर्टाचा निकाल येईपर्यंत बोलणार नाही. भुतकाळामध्ये एखादी गोष्ट घडली आणि त्याची माहिती दिली. तो कसा गुन्हा होतो.” असा प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केला. २७ ऑगस्टपासून जन आशीर्वाद यात्रेला पुन्हा सुरुवात होईल असं त्यांनी यावेळी सांगितलं.
हवाई दलाचे मिग -२१ बाइसन
लढाऊ विमान कोसळले
राजस्थानच्या बाडमेर येथे भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले आहे. हवाई दलाचे मिग -२१ बाइसन लढाऊ विमान कोसळले आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे अपघातात पायलट सुखरूप आहे. प्रशिक्षणादरम्यान हे विमान कोसळल्याची माहिती मिळत आहे. एनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.
निवृत्त न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या
वडिलोपार्जित घराजवळ बॉम्ब फोडला
सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या वडिलोपार्जित घराजवळ बॉम्ब फोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या खळबळजनक घटनेची माहिती मिळताच अनेक पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. निवृत्त न्यायमूर्तीच्या घराजवळ एकापाठोपाठ दोन बॉम्ब फोडण्यात आले आणि नंतर आरोपींनी दुचाकीवरुन पळ काढला अशी माहिती समोर आली आहे. निवृत्त न्यायमूर्ती अशोक भूषण यांचा श्री राम मंदिराबाबत निर्णय सुनावण्यासाठी खंडपीठात समावेश होता.
5 सप्टेंबर पूर्वी सर्व
शिक्षकांचे लसीकरण करा
या महिन्यात राज्यांना दोन कोटींपेक्षा जास्त करोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यामुळे ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनापूर्वी सर्व शालेय शिक्षकांचं प्राधान्याने लसीकरण करण्यात यावं, असे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी राज्यांना दिले आहेत.
अफगाणिस्तानचा माजी मंत्री
जर्मनीत झाला डिलिव्हरी बॉय
अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता हाती घेतल्यानंतर माजी राष्ट्रपती अशरफ घनी यांच्यासह मंत्र्यांनी पळ काढला. तालिबानच्या कामाची पद्धत माहिती असल्याने मृत्यूदंडाशिवाय दुसरी शिक्षा नाही, अशी भीती राष्ट्रपतींसह मंत्र्यांना होती. त्यामुळे सामान्य नागरिकांसह मंत्र्यांनी अफगाणिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रपती अशरफ घनी यूएईत आहेत. मात्र अफगाणिस्तानातून इतर देशात गेल्यानंतर अनेकांना रोजीरोटीचा प्रश्न भेडसावू लागला आहे. दुसऱ्या देशात गेल्यानंतर तिथलं राहणीमान आणि पद्धत शिकून घेताना नागरिकांना अडचणी येत आहेत. अशात एका माजी मंत्र्याला पूर्वीचा थाटमाट घेतल्याने माजी मंत्र्याला जर्मनीत डिलिव्हरी बॉयचं काम करावं लागत आहे.
नाशिक पोलिसांची
नारायण राणेंना नोटीस
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ झालीय. नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांना नोटीस बजावली आहे. त्यात राणेंना 2 सप्टेंबरपर्यंत नाशिकला हजर राहण्याचे आदेश दिलेत. नाशिकमध्ये राणेंविरोधातील पहिला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांना मंगळवारी (24 ऑगस्ट) कोकणात जाऊन अटक केली. रात्री उशिरा राणेंना कार्टाकडून अटी शर्तींसह जामीन मिळाला. मात्र, यानंतर लगेचच नाशिक पोलिसांनी नोटीस बजावत राणेंना दुसरा धक्का दिलाय.
या आठवड्यात बँका सलग
4 दिवस बंद राहणार
येत्या काही दिवसांत जर तुम्ही बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाची काम करणार असाल, तर तुम्ही ती तात्काळ उरका, अन्यथा तुम्हाला बराच काळ थांबावे लागेल. कारण बँका सलग 4 दिवस बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ऑगस्ट 2021 महिन्यासाठी बँक सुट्ट्यांची यादी जारी केली होती.
SD social media
9850 60 3590