राष्ट्रहिताच्या आड येणाऱ्यावर
कारवाई कराच : पंतप्रधान
देशाची फसवणूक करणाऱ्यांसाठी जगात कुठलीही जागा सुरक्षित असता कामा नये. कोणी कितीही ताकदवान असो, जर ती व्यक्ती राष्ट्रहीत आणि जनहीत यांच्यामध्ये येत असेल तर त्यावर कारवाई करतांना केंद्रीय यंत्रणांनी मागे रहाता कामा नये असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. केंद्रीय मुख्य दक्षता आयोग आणि केंद्रीय अन्वेषण विभागच्या संयुक्त परिषदमध्ये आभासी कार्यक्रमाद्वारे अधिकाऱ्यांना संबोधित करतांना हे परखड मत व्यक्त केलं आहे.
अखेर रुपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड, उद्या स्वीकारणार पदभार!
गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर यांची अखेर नियुक्ती झाली आहे. याबद्दल राज्य सरकारकडून याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
रुपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. आज राज्य सरकारकडून याबद्दल अधिसूचना काढण्यात आली आहे. रुपाली चाकणकर या उद्या महिला आयोगाच्या पदभार स्वीकारणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.
विशेष न्यायालयाने नाकारला
आर्यन खानला जामीन
शाहरुख खानचा मुलगा आर्यनच्या जामिनावर आज न्यायालय निर्णय देण्यात आला आहे. आर्यन सध्या मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आहे. कॉर्डेलिया क्रूझ येथे छापा टाकल्यानंतर त्याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती. १३ ऑक्टोबर रोजी आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी केल्यानंतर न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.व्ही.पाटील यांनी आपण २० ऑक्टोबर रोजी निकाल देणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान आर्यन खानला विशेष न्यायालयाने जामीन नाकारला आहे.
चौथ्या समन्सनंतर अखेर जॅकलिन फर्नांडिस ED कार्यालयात दाखल
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जॅकलीन फर्नांडिस ईडीच्या रडारवर सापडल्याने या चर्चा सुरु झाल्या होत्या. दरम्यान 200 कोटी रुपयांच्या मनी लॉऩ्ड्रिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी जॅकलीन चौथ्यांदा गैरहजर राहिली होती. ईडीकडून चारवेळा समन्स बजावल्यानंतर मात्र बुधवारी जॅकलिन फर्नांडिस चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात दाखल झाली आहे.
25 सप्टेंबर, 15 ऑक्टोबर, 16 ऑक्टोबर आणि 18 आॕक्टोबरला जॅकलिनला ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. चार वेळा समन्स बजावूनही जॅकलिन चौकशीसाठी उपस्थित राहिली नाही. यापूर्वी 30 ऑगस्ट रोजी जॅकलीनची दिल्लीत 6 तास चौकशी करण्यात आली होती. सुकेश चंद्रशेखर यांच्याविरोधात नोंदवण्यात आलेल्या फसवणुकीच्या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस यांचे मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) जबाब नोंदवला जात आहे. जॅकलीन या प्रकरणात साक्षीदार आहे. सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिन यांच्यात काही आर्थिक व्यवहार झाला आहे का नाही याची तपासणी करत आहेत.
मंत्री एकनाथ शिंदे यांचा आज
पाचोऱ्यात गुप्त दौरा
जळगावमध्ये सध्या राज्याचे नगर विकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी आज (२० ऑक्टोबर) पाचोऱ्यात केलेल्या गुप्त दौऱ्याची जोरदार चर्चा आहे. त्यांनी केवळ एक आमदार आणि एका मंत्र्याला याबाबत माहिती देत अत्यंत गुप्तपणे जळगावला भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी पाचोरा व भडगाव नगर परिषद अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. तसेच आमादर किशोर आप्पा पाटील यांच्याकडून आगामी पालिकेच्या राजकारणाची माहिती जाणून घेतली.
प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश
पोलिसांनी घेतले ताब्यात
उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील जगदीशपुरा भागात पोलीस कोठडीत एका व्यक्तिचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मात्र आता यानंतर येथील राजकारण तापायला सुरूवात झाल्याचे दिसत आहे. या व्यक्तीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आग्राकडे निघालेल्या काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी यमुना एक्स्प्रेस वे वर रोखलं व त्यानंतर त्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे यमुना एक्स्प्रेस वे च्या एंट्री पॉईंटवर पोलीस व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची देखील झाल्याचे समोर आले.
मुंबईचे माजी पोलीस
आयुक्त परमबीर सिंह बेपत्ता
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर अॕट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, परमबीर सिंह नेमके कुठे आहेत, याचा ठावठिकाणा अद्याप समजलेला नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकलेली नाही. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान आज राज्य सरकारने परमबीर सिंह यांच्यावरच्या कारवाईसंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. परमबीर सिंह याच्यावर कारवाई न करण्याचं आश्वासन आता पाळलं जाण्याची शाश्वती देता येणार नाही, असं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे.
उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस,
४६ लोकांना आपले प्राण गमवाले
उत्तराखंडमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने मुसळधार पाऊस, ढगफुटी आणि त्यातून निर्माण झालेली पूरस्थिती असा घटना घडल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून त्यामुळी राज्यभर अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये आत्तापर्यंत तब्बल ४६ लोकांना आपले प्राण गमवाले लागले आहेत. अनेकजण बेपत्ता आहे.
मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचने
सेक्स टुरिझमचा केला पर्दाफाश
मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचने सेक्स टुरिझमचा पर्दाफाश केला आहे. यावेळी दोन महिलांना अटक करण्यात आली असून दोन तरुणींचा सुटका करण्यात आली. एक महिला आपल्या सहकाऱ्यासोबत मिळून सेक्स टुरिझम चालवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला होता. संबंधित महिलेला याआधीही २००२ मध्ये अनैतिक वाहतूक कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. पोलिसांनी ग्राहक असल्याचा बनाव करत सापळा रचला होता.
नवीन नोकऱ्यांमध्ये मासिक
एक टक्के स्थिर वाढ
सप्टेंबरमध्ये नवीन नोकऱ्यांच्या ऑनलाईन विक्रीत वाढ झाल्यामुळे मुख्यत्वे प्रिंटिंग आणि पॅकेजिंग क्षेत्रात तसेच बीपीओ आणि आयटीईएस, आयात आणि निर्यात क्षेत्रांमध्ये 1 टक्क्यांची वाढ झाली. मॉन्स्टर डॉट कॉमच्या मॉन्स्टर एम्प्लॉयमेंट इंडेक्सनुसार, या वर्षी ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये नवीन नोकऱ्यांमध्ये एक टक्क्यांची स्थिर मासिक वाढ झाली.अहवालात म्हटले आहे की, सप्टेंबर 2021 मध्ये ऑनलाईन विक्री वाढल्यामुळे प्रिंटिंग आणि पॅकेजिंगसाठी भरती 11 टक्क्यांनी वाढली. त्यानंतर बीपीओ आणि आयटीईएस पाच टक्के, आयात आणि निर्यात चार टक्के, किरकोळ दोन टक्के आणि प्रवास आणि पर्यटन दोन टक्क्यांनी वाढले.
चीनने घेतली हायपरसोनिक
मिसाईलची चाचणी
भारताचा प्रमुख शत्रू चीननं सगळ्या जगाचं टेन्शन वाढवणारं काम केलं आहे. चीननं जगातील सर्वात मोठी भयानक स्पर्धा सुरु केली आहे. चीननं अंतराळातून जमीनीवर अणवस्त्र डागण्याची चाचणी केली आहे. चीननं त्यांच्या लाँग मार्च रॉकेटच्या मदतीनं हायपरसोनिक मिसाईल अंतराळातून जमिनीवर सोडली. मिसाईलनं पृथ्वीला प्रदक्षिणा घातली त्यानंतर ती मिसाईल दिलेल्या टार्गेटवर डागण्यात आली. अंतराळातून चीन जमिनीवर कुठेही अणवस्त्र डागू शकतो यामुळं जगाचं टेन्शन वाढलंय.
SD social media
9850 60 3590