“कौन बनेगा करोडपती” त ५ कोटी रुपये जिंकणारा सुशीलकुमार झाला कंगाल

कौन बनेगा करोडपती”त ५ कोटी रुपये जिंकणारा सुशीलकुमार असा कंगाल झाला…ज्ञानाचं भांडार असणाऱ्यांची आपल्याला ओळख करुन दिली. कौन बनेगा करोडपतीने अनेकांचं जीवन देखील बदलून टाकलं आहे. असाचं एक विजेता आहे सुशील कुमार ज्याने केबीसी ५ जिंकलं. सुशीलकुमार याने १ कोटी नाही ५ कोटी जिंकले होते. सुशीलकुमार केबीसी ५ मध्ये सहभागी झाले होते, आपल्या ज्ञानाच्या बळावर त्यांनी ५ कोटी रक्कम जिंकली. बिहारच्या सुशीलकुमारचे महानायक अमिताभ बच्चन देखील फॅन झाले होते.

सुशील कुमारने जिंकलेल्या ५ कोटी रुपयांमुळे त्याचं जीवन बदललं. पण सुशीलकुमारचे वाईट दिवस सुरु व्हायला वेळ देखील लागला नाही. सुशीलकुमारने फेसबूक पोस्टवर लिहिलं आहे, कौन बनेगा करोडपती जिंकल्यानंतर त्याची वाईट वेळ चालून आली. यानंतर काही दिवसांनी ते कंगाल देखील झाले. सुशील कुमार यांनी लिहिलं आहे.

२०१५ आणि २०१६ ही वर्ष माझ्यासाठी खूप कठीण होती. मी लोकल सेलिब्रिटी झालो होतो, बिहारमध्ये वेगवेगळ्या जागेवर महिन्यात १० ते १५ शो मी अटेन्ड करत होतो. याच दरम्यान मी आपल्या अभ्यासापासून दूर देखील जात होतो.

पुढे त्याने आपल्या फेसबूक पोस्टवर लिहिलं आहे, कारण मी एक लोकल चेहरा होतो, त्यावेळी मी मीडियाला खूपच गंभीरतेने घेत होतो. खरंतर अनेक पत्रकार माझ्याबद्दल लिहित होते, माझी मुलाखत देखील घेत होते. मला त्यांच्याशी बोलण्याचा कोणताही अनुभव नव्हता. तरी देखील मी त्यांना आपले बिझनेस आणि इतर गोष्टींबद्दल सांगायचो. कारण लोकांना वाटू नये की मी बेरोजगार आहे. खरंतर काही दिवसांनीच माझा बिझनेस तोट्यात येत होता.

सुशीलच्या म्हणण्यानुसार केबीसीनंतर तो लोकांची भलाई करणारा माणूस झाला, ज्याला गुपचूप दान देणे पसंत होते. मी एका महिन्यात अनेक इव्हेंटला उपस्थित राहून पैसे दान करत होतो. ज्यामुळे अनेक वेळा लोकांनी मला फसवलं देखील, ज्याविषयी मला उशीरा समजलं. अभ्यासापासून दूर जात असल्याने सुशीलला इतरांशी बोलणे आता नकोसं झालं होतं.

सुशील कुमार याने हे देखील सांगून टाकलं की तो दारु आणि सिगारेटच त्याला व्यसन लागलं होतं. आपल्या कंगाल होण्याच्या कहाणीबाबत सुशील सांगत होते, आणि त्याने हे देखील यात सांगितलं की, ही कहाणी तुम्हाला जरा फिल्मी वाटू शकते.

सुशीलने दिलेल्या माहितीनुसार एका रात्री तो सिनेमा पाहत होता, यावर त्याच्या पत्नीला राग आला, त्यांचं थोडं भांडण झालं, तो नाराज होवून घराबाहेर आला, यानंतर एका इंग्रजी दैनिकाच्या पत्रकाराने त्याला कॉल केला.

सुशीलने सांगितलं, त्या पत्रकाराशी माझं चांगलं बोलणं सुरु होतं, तेव्हाच सुशील यांना असा प्रश्न विचारण्यात आला तो त्यांना आवडला नाही. या प्रश्नावर सुशीलने उत्तर देताना सांगितलं, कौन बनेगा करोडपती या शो मधून जिंकलेले ५ कोटी रुपये आता संपलेले आहेत, मी दोन गाई पाळल्या आहेत आणि त्यांचं दूध विकून घर चालवतोय. ही बातमी पसरली आणि सुशीलने सर्वांपासून अंतर ठेवणं सुरु केलं होतं.

सुशीलचा आवडता विषय हा सिनेमा आहे, म्हणून तो मुंबईला आला आणि त्याने आपलं नशीब आजमावलं. सुशीलने दिलेल्या माहितीनुसार त्याने सिनेमा निर्मितीविषयी जाणून घेतलं, आपल्या मित्रासोबत तो मुंबईत राहिला आणि त्याने तीन स्क्रीप्ट लिहिल्या.

ही स्क्रीप्ट लिहिल्यानंतर त्याला एका प्रोड्युसरने २० हजार रुपये दिले. बिहारला परतल्यानंतर सुशीलने शिक्षक होण्याची तयारी केलीय, आणि तो ट्यूशनही घेतोय. वेळेचा आघात ओळखून त्याने आता दारु आणि सिगारेट कायमची सोडली आहे. सुशील आता पर्यावरण संवर्धनसाठीही काम करतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.