देशातील सर्वात श्रीमंत श्री क्षेत्र तिरुपती बालाजी मंदिरात आता प्लास्टिक दिसून येणार नाही. येथे भक्तांना मिळणारा प्रसाद आता बायोडिग्रेडेबल बॅगेत मिळणार आहे.
डिफेंस रिसर्च ऍंड डेवलेपमेंट ऑर्गनाइजेशन म्हणजेच DRDOने तिरूपतीमध्ये बायोडिग्रेडेबल बॅग लॉंच केली आहे.
DRDO चे अध्यक्ष सतिश रेड्डी, तिरुमला देवस्थान समितीचे कार्यकारी अधिकारी डॉ के.एस.रेड्डी आणि ऍडिशनल EO ए वी धर्म रेड्डीने रविवारी (22 ऑगस्ट)ला येथे एक स्पेशल विक्री काउंटरचे उद्घाटन केले आहे. त्यानंतर लाडू कॉम्लेक्सच्या बाहेर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.DRDOचे अध्यक्षांनी म्हटले की, हैद्राबाद मध्ये DRDO च्या अत्याधुनिक बायोडिग्रेडेबल बॅग बनवण्यासाठी अनेक संशोधन आणि प्रयोग केले आहेत. पर्यावरणाशी सुसंगत अशा गोष्टी बनवण्यासाठी DRDOचे संशोधन अद्यापही जारी आहे.
सिंगल युज प्लास्टिकचा वापर कमी करत , आम्ही कॉर्न स्टार्चपासून पर्यावरण पूरक बॅग घेऊन आलो आहोत. ही बॅग 90 दिवसांनंतर आपोआप खराब होते. तसेच पर्यावरणात मिसळून जाते. जनावरांनी ही बॅग खाल्ली तरी काहीही अडचण येत नाही. त्यांनी म्हटले की पेट्रोकेमिकल्सपासून बनवण्यात आलेलल्या पॉलिथिन बॅग पर्यावरणासाठी विषारी असतात. त्यांना नष्ट व्हायला 200 वर्ष लागतात.
बायोडिग्रेडेबलची बॅगची सुरूवात
बायोडिग्रेडेबल बॅगची सुरूवात एक पर्यावरणपूरक पर्याय आहे. हे प्रोडक्ट मानव जातीच्या अस्तित्वासाठी गरजेचे आहे. काही दिवस भक्तांची प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर याची विक्री पूर्ण क्षमतेने सुरू करणार असल्याचे डॉ के एस रेड्डी यांनी म्हटले आहे.