पुणे विद्यापीठातर्फे पीएच.डी प्रवेशासाठी परीक्षा पुन्हा लांबणीवर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रवेशासाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा लांबणीवर पडली आहे. ही परीक्षा 22 ऑगस्ट म्हणजे आज होणार होती. मात्र, आता ही ऑनलाईन परीक्षा 5 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास वारंवार मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे परीक्षेची तारीखही पुढे ढकलण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली.

यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार प्रवेश परीक्षा सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत ऑनलाईन होणार होती. लॉग इन केल्यापासून पेपर सोडवण्यासाठी दोन तासांचा अवधी देण्यात आला होता. 5 सप्टेंबरलाही हेच वेळापत्रक कायम राहण्याची शक्यता आहे.

नेट, सेट, गेट, सीएसआयआर, आयसीएआर, डीबीटी आणि परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या पीएचडी प्रवेश परीक्षेसाठी सवलत देण्यात आली होती. या उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे.

प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुल्या प्रवर्गासाठी 1 हजार रुपये शुल्क असेल तर राखीव प्रवर्गासाठी 750 रुपये शुल्क आकारण्यात आले. तर, जे उमेदवार थेट मुलाखतीसाठी पात्र आहेत त्यांच्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 800 रुपये तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 600 रुपये शुल्क ठेवण्यात आले होते.

तब्बल 30 वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतीय संरक्षण दलाचे तिन्ही प्रमुख पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीला (NDA) भेट दिली. यापूर्वी 1991 मध्ये तिन्ही दलांच्या प्रमुखांनी पुणे NDA ला भेट दिली होती. नौदलप्रमुख अॕडमिरल करमबीर सिंग, हवाईदलप्रमुख राकेश कुमार भदौरिया आणि लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी खडकवासला येथील एनडीएला एकत्र भेट दिली. तिन्ही संरक्षण सेवांचे प्रशिक्षण देणाऱ्या या प्रबोधिनीसाठी हा एक ऐतिहासिक क्षण होता. या भेटी दरम्यान त्यांनी एनडीएतील प्रशिक्षण सुविधांचा आढावा घेतला.
(फोटो गुगल)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.