बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचे प्रसिद्ध गाणे ‘बेबी डॉल’ फेम गायिका कनिका कपूर (Kanika Kapoor) आज (21 ऑगस्ट) आपला वाढदिवस साजरा करत आहे आहे. काही वर्षांपूर्वी कनिकाने एका व्यक्तीचा फोटो शेअर केला आणि ती कोणाला डेट करत आहे हे सांगितले होते. हा फोटो लेखक शोभा डे यांचा मुलगा आदित्य किलाचंद यांचा होता. मध्यम अहवालानुसार, कनिका आणि आदित्य बऱ्याच काळापासून एकमेकांना ओळखत होते. एवढेच नाही तर काही वर्षांपूर्वी दोघेही फ्रान्समध्ये सुट्ट्या घालवण्यासाठी गेले होते.
आदित्यसोबतच्या लग्नाबाबत बोलताना कनिका म्हणाली होती की, आम्हाला दोघांनाही लग्नाची घाई नाही. दोघांनाही सध्या एकमेकांसोबत अधिकाधिक वेळ घालवायचा आहे. कनिका सांगते की, आदित्यचे कुटुंब तिला पूर्ण पाठिंबा देते आणि तिला कुटुंबातील एक सदस्य मानतात. मात्र, काही काळानंतर या चर्चा आणि त्याचं नातं संपुष्टात आलं. सध्या कनिका, सिंगल मदर बनून 3 मुलांची काळजी घेत आहे.
कनिका 3 मुलांची (दोन मुली आणि एक मुलगा) आई आहे. ती त्यांना ‘सिंगल मदर’ म्हणून वाढवत आहे. 1997 मध्ये, जेव्हा कनिका 18 वर्षांची होती, तेव्हा तिचा विवाह अनिवासी भारतीय उद्योगपती राज चंडोकशी झाला होता. त्यानंतर 2012मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
लग्न मोडण्याबाबत कनिकाने एका मुलाखतीत सांगितले होते, ‘पहिले लग्न मी खूप घाईत केले होते. असं झालं की, मी एका माणसाला भेटले, प्रेमात पडले आणि लग्न केले. मला वाटते की, हा विवाह माझी चूक होती. मी विवाहित जीवनातील काही पैलूंचा आनंद लुटला, पण बाकीच्या गोष्टींमध्ये जणू मी एका कारावासात होते. या काळात मी मानसिक छळालाही सामोरी गेले आणि नैराश्यात गेले होते.’
कणिका म्हणते, ‘वयाच्या 25 व्या वर्षी मी माझ्या तिसऱ्या मुलाला जन्म दिला. त्यामुळे माझ्या आयुष्यात करिअरसाठी काहीच जागा नव्हती. 2012 मध्ये घटस्फोट झाला आणि मी लंडनमध्ये मुलांसोबत एकटं राहण्याचा निर्णय घेतला. त्याच वेळी, मी काही नवीन गाणी गाण्याची संधी शोधत होते.’
(फोटो गुगल)