नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यात भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. जांबुटके गावात जमिनीतून स्फोटकांसारखा आवाज झाला, यानंतर स्थानिकांमध्ये घबराट पसरली होती. प्रशानकाडून मात्र घाबरून न जाण्याचं आवाहन करण्यात आलं.
मेरी येथील भूकंप मापक यंत्राच्या अहवालानुसार रात्री 8.58, 9.34 आणि 9.42 असे तीन वेळा भुकंपाचे धक्के जाणवले. या तीन भुकंपाची तीव्रता 3.4, 2.1 आणि 1.9 एवढी होती. भुकंपाचं केंद्र नाशिक वेधशाळेपासून 16 ते 20 किमी अंतरावर दिंडोरी तालुक्यामध्ये असण्याची शक्यता आहे, अशी माहिती नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणने दिली आहे. या भुकंपामध्ये अजूनपर्यंत कोणतीही हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.